Back
नाशिक दौऱ्यावर शिंदे: शेतकऱ्यांची नाराजी, मोठा मोर्चा येतोय!
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 12:00:12
Nashik, Maharashtra
nsk_shindepc
feed by live u 51
Nashik breaking
शशिकांत शिंदे byte points
On नाशिक दौरा
- आज राज्यात नाराजी मोठ्या प्रमाणात आहे
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे
- आज लोकांचे सूचना मी ऐकून घेतले
- बेरोजगार प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे
- नाशिक विकसित आहे असं सांगतात पण अजून प्रश्न आहेत
- वरिष्ठांची चर्चा करून येणाऱ्या काळात नाशिक मध्ये एक मोठा मोर्चा काढला जाईल
- येणाऱ्या काळात संघटना मोठी केली जाईल आमचा लक्ष 2029 आहे
- अनेक जण पक्ष सोडून गेले आहेत नाशिक जिल्ह्यात मोठी ताकत राष्ट्रवादी ची होती
- पुन्हा ते टाकत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आह
On महाविकास आघाडी समन्वय
- आंदोलनाची दिशा महाविकास आघाडी ठरवणे गरजेचे आहे,सरकारचे वाभाडे काढता येईल
On निवडणुका
- आघाडी म्हणून आपण आधी चर्चा करावी
- आणि नंतर काही अडचण आले तर आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करू
- जर कोणी स्वतंत्र लढणार असतील तर आमची देखील तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत
On ठाकरे बंधू युती
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत अध्यप निर्णय नाही
- शरद पवार साहेब यावर बोलतील
On लाडकी बहीण
- निवडणुका जिंकण्यासाठी यांनी सरसकट पैसे वाटले
- आता सरकारवर बोजा वाढत आहे त्यामुळे निकष वर चर्चा सुरू आहे
- पण माझ्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पर्यंत ते देखील थांबवण्यात आले आहेत
On साठे न्यायाधीश
- 2024 ला त्यांनी राजीनामा दिले आहे असे भाजपाचे नेते सांगत आहेत
- भाजप पदाधिकाऱ्यांना तुम्ही जर न्यायाधीश केले तर न्याय व्यवस्था देखील संशयाचा भोवऱ्यात येईल
- आता आमचा विश्वास फक्त न्यायव्यवस्था वर आहे त्यामुळे असे झाले तर ते दुर्दैव आहे
On बेस्ट
- यावर जर एकमत होत नसेल तर उपयोग नाही
- ते एकत्र आहेत असं दखवतात मात्र चित्र वेगळे आहे
On दिल्ली दौरा
- इंडिया आघाडी संदर्भात बैठक होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे दिल्ली ला गेले आहेत शरद पवार देखील जाणार आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowAug 06, 2025 16:00:58Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 0608ZT_BARAMATISTLADI
FOTO 1
बारामतीत चालू एसटीत कोयता हल्ल्याने दहशत..
कोयता हल्ल्याच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू..
Anchor : बारामती-इंदापूर मार्गावर एसटी बसमध्ये 31 जुलै रोजी एका मातेफिरुने प्रवाशावर कोयत्याने अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली होती.. या माते फिरवणे स्वतःवर देखील कोयत्याने वार केले होते.. या हल्ल्यात एक प्रवाशी महिला कोयता हल्ल्याच्या धक्क्याने बेशुद्ध झाली होती.. जवळपास सहा ते सात दिवस त्या महिलेवर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान या महिलेचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे वर्षा रामचंद्र भोसले असे त्या महिलेचे नाव आहे.. कोयता हल्ला धक्क्याने महिलेचा हकनाक बळी गेल्याने भोसले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे..
0
Report
SNSWATI NAIK
FollowAug 06, 2025 16:00:54Navi Mumbai, Maharashtra:
story slug - मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला धडक देणाऱया पोलिसावर गुन्हा दाखल
मद्यधुंद पोलिसाचे व्हिडीओ व्हायरल
पुलीस का व्हेएडिओ व्हायरल
FTP slug - nm police car accident
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor: एका मद्यधुंद पोलिसाने बेदरकारपणे कार चालवून एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना घणसोलीतील सिम्फ्लेक्स परिसरात बुधवारी दुपारी घडली. ही संपूर्ण घटना पाठीमागून येणाऱया एका कारवर लावण्यात आलेल्या डॅशकॅममध्ये कैद झाली असून, या अपघाताचे व मद्यधुंद पोलिसाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या प्रकरणातील मद्यधुंद पोलीस मुंबई पोलीस दलात कार्यरत असुन रबाळे पोलिसांनी त्याच्यावर बेदरकारपणे वाहन चालवून स्वत:च्या व इतरांच्या जिवीताला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मद्यधुंद पोलिसाचे नाव रविंद्र बापु पवार (42) असे असून तो मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. तसेच तो घणसोलीतील घरोंदा वसाहतीत राहण्यास आहेत. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रविंद्र पवार हा त्याच्या बलेनो कारमधुन पोलीस पाटी लावून घणसोलीतील डी-मार्टच्या दिशेने जात होता. यावेळी सदर रविंद्र पवार याने बेदरकारपणे तसेच भरधाव वेगात वाहन चालवुन नेल्याने त्याच्या कारची धडक रस्त्याने जाणाऱया विकी उचगावकर (39) याच्या पल्सर दुचाकीला धडक लागली. त्यामुळे विकी दुचाकीसह खाली पडून जखमी झाला. हा सर्व प्रकार पाठीमागून येणाऱया एका कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाला.
त्यानंतर नागरीकांनी रविंद्र पवार याची कार अडवली असता, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळुन आला. यावेळी त्याने नागरिकांसोबत असभ्य वर्तन केले. यावेळी सदर पोलिसाच्या कारमध्ये फ्लॅस्टीकच्या बॉटलमध्ये मद्य आढळुन आले. रबाळे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मद्यधुंद रविंद्र पवार याला ताब्यात घेतले. तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेले. या पोलिसाने मद्य प्राशन केल्याचे तसेच नशेमध्ये त्याने दुचाकीला धडक दिल्याचे निष्पन्न झाल्याने रबाळे पोलिसांनी रविंद्र पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला नोटीस देऊन सोडून दिले आहे. मात्र या मद्यधुंद पोलिसाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
gf
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 06, 2025 15:33:43Beed, Maharashtra:
बीड: पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक, बैठकीला आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा गैरहजर
Anc- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठिकेचे आयोजन कार्यात करण्यात आले. मात्र या बैठकीला परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि केजचे आमदार नमिता मुंदडा आज गैरहजर राहिले. जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुंडे आणि मुंदडा यांनी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता उद्याच्या दौऱ्यात आमदार धनंजय मुंडे उपस्थित राहतील का याकडे लक्ष वेधले आहे.
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 06, 2025 15:33:00Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली महापालिकेचा निर्णय.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा पहिल्यांदाच निर्णय.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीचा निर्णय
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकण शॉप ,मटन शॉप आणि मोठे जनावराचे कत्तलखाने बंद राहणार.
बाईट..कांचन गायकवाड
उपायुक्त केडीएमसी
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 06, 2025 15:22:12Kolhapur, Maharashtra:
Kop Raju Shetty 121
Feed :- Live U
Anc :- जनतेच्या रेट्यामुळे काय होऊ शकतं हे महादेवी हत्तीनीच्या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे सरकारने देखील याचा विचार करून आपला कारभार करावा असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलय.
महादेवी हत्ती आज देखील धडधाकटच आहे असा आमचा दावा आहे. तरीदेखील कायद्याच्या चौकटीत राहून महादेवी हत्ती परत येण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरले आहे असं देखील शेट्टी म्हणालेत. वनतारा CEO सोबत झालेल्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play 121
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 06, 2025 15:21:45Kolhapur, Maharashtra:
Kop Nandini villagers Choppal
Feed :- Live U
Anc :- भारतातील जनतेच्या जनरेट्यामुळेच नांदणी मठातील महादेवी हत्तीन परत येण्याचा मार्ग मोकळा झालाय अशी प्रतिक्रिया नांदणी ग्रामस्थांनी दिलीय. वनताराचे CEO दुसऱ्यांदा कोल्हापुरात येऊन नांदणी मठाचे मठाधिपती आणि लोकप्रतिनिधी यांना न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही देखील हातभार लावू असा आश्वासन दिल. इतकच नाही तर नांदणी मठामध्ये वनतारासारख्या सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलय. या आश्वासनानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुटकेचा निस्वास टाकलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play Choppal
0
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 06, 2025 15:16:19Nashik, Maharashtra:
nsk_missing
ब्रेकिंग न्यूज
उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागात झालेल्या जलप्रलयात मालेगावचे सात पर्यटक बेपत्ता
मंगळवारपासून संपर्क होत नसल्याने कुटुंबियांची वाढली चिंता
येवले व कोतकर कुटुंबातील सात जण १ ऑगस्ट रोजी चारधाम यात्रेसाठी झाले होते रवाना
शासन व प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी
वाहनचालकांशीही संपर्क तुटल्याची माहिती
बेपत्ता पर्यटकांची नावे —
सुरेश दत्तात्रय येवले (५३), नयना सुरेश येवले (४७), अनिकेत सुरेश येवले (२५), रा मालेगाव
दीपक कोतकर, शुभांगी कोतकर, शौनक कोतकर, शर्विल कोतकर
रा नाशिक
0
Report
SNSWATI NAIK
FollowAug 06, 2025 15:01:26Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पुर्ववैमनस्यातून शेजारील महिलेच्या लहान मुलांना करायला लावले अश्लिल चाळे,
मतीमंद बच्चे के साथ गलत व्यवहार
FTP slug - nm rabale crime
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: घणसोलीतील एका 40 वर्षीय महिलने पूर्ववैमनस्यातून आपल्या शेजारील महिलेच्या 10 वर्षीय गतीमंद मुलाला आणि 6 वर्षीय मुलीला अश्लिल चाळे करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आरोपी महिलेने या लहान मुलांचे अश्लिल चाळे करतानाचे विडिओ मोबाईलमध्ये काढून इन्स्टाग्रामवर व्हायरल करुन बदनामी देखील केलेय. सदर विडिओ तक्रारदार महिलेच्या निदर्शनास आल्यावर महिलेने रबाळे पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. रबाळे पोलिसांनी तात्काळ गभीर दखल घेत या महिलेविरोधात पोक्सो तसेच आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करत तिला अटक केली असून अधिक तपास करण्यात येतोय.
gf-
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 06, 2025 15:01:10Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0608ZT_WSM_DEATH_YOUTH
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेडगाव येथे शेतात कीटकनाशक फवारणीसाठी जात असताना ट्रॅक्टर वरून पडून चाकाखाली दबल्यानं एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडलीये.करण गजानन गोडघासे असं मृत मुलाचं नाव असून तो अकराव्या वर्गात शिकत होता आणि कॉलेज सुटल्यावर शेतात मजुरीने काम करायचा.अचानक झालेल्या या दुर्घटनेत करण हा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जातं आहे घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून घटनेचा पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.
0
Report
KJKunal Jamdade
FollowAug 06, 2025 14:33:01Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुद्दे*
बाईट ऑन न्यायाधीश नेमणूक प्रकरण
2024 सालीच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय..
न्यायमूर्तींची नेमणूक करताना त्यासाठी एक समिती असते..
मुख्य न्यायमूर्ती त्या समितीत असतात..
आता तुम्ही त्यांच्या निर्णयावर आक्षेप घेणार का ?
बहरूल इस्लाम हे काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले होते..
त्यानंतर त्यांना न्यायाधीश करण्यात आलं..
त्यावेळी देखील काँग्रेसने स्पष्टीकरण देताना त्यांनी राजीनामा दिला असल्याचा कारण सांगितलं होतं..
रोहित पवारांना नवनवीन संशोधन करण्याची सवय लागली आहे..
त्यांनी इतिहास देखील तपासायला हवा..
मुख्य न्यायमूर्ती अध्यक्ष असलेल्या समितीवर ते आक्षेप घेतात हे गंभीर..
ऑन राहुल गांधी न्यायालय टिप्पणी
त्यांचा भंपकपणा नेहमी समोर आलेला आहे..
उद्या ते न्यायव्यवस्थेवर देखील टीका करायला सुरुवात करतील..
देशाबाहेर जाऊन देशाला व पंतप्रधानांना बदनाम करायचं..
यासाठी लोकसभेचे व्यासपीठ त्यांना होतं...
आता तर त्यांना डोनाल्ड ट्रम्प चे दाखले घ्यायची गरज भासू लागली..
देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबर वर आली त्याचं कौतुक त्यांना नाही..
मात्र डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतो त्याचं राहुल गांधींना कौतुक...
ऑन उद्धव ठाकरे दिल्ली दौरा
राज ठाकरे यांना काय पसंत आहे हे मला माहित नाही..
इंडिया आघाडीचा दायित्व उद्धव ठाकरेंना घ्यावा लागते..
ते दिल्लीला भोजन करतील कदाचित राज ठाकरेंनाही जेवायला बोलावतील..
एका ताटात जेवतील का नाही माहित नाही..
त्यांचा निर्णय त्यांना करायचा आहे..
आगामी निवडणुकात महायुती मजबूत असून आम्ही निवडणुका जिंकू..
ऑन एकनाथ शिंदे दिल्ली दौरा
कुठल्याही मोठ्या घडामोडी घडणार नाही.. हे केवळ तर्कवितर्क आहे..
तिथे काय चर्चा होतात मला माहित नाही..
शिंदे साहेब जेष्ठ नेते..
प्रशासनात काम करताना त्यांचा कुठेही अनादर करण्याचा प्रश्न येत नाही..
ते पंतप्रधानांना भेटायला गेले त्याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही...
0
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 06, 2025 14:19:41Nashik, Maharashtra:
nsk_pethtraffic
feed by 2C
anchor नाशिक पेठ महामार्गावर गेल्या 24 तासापासून वाहतूक कोंडी झाली आहे यामुळे शेकडो ट्रक रस्त्यात अडकले आहेत करंजाळी घाटात झालेल्या अपघातामुळे सातत्याने येथे वाहतूक कोंडी होण्याचा प्रश्न निर्माण होत असतो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाटाची समस्या न सोडवल्यामुळे अधिक अडचणी निर्माण झाले आहेत
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 06, 2025 14:03:54Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक
खड्ड्याभोवती रांगोळी काढून केलं वृक्षारोपण
Ulh potholes agitation
Anchor उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्ड्यानंचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झाले असून ,फार्व्हर लाईन ते मध्यवर्ती रुग्णालय रस्त्यावर महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यानं भोवती रांगोळी काढून वृक्षारोपण केलंय, महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी ये आंदोलन करण्यात आलंय, येणाऱ्या गणपतीच्या आगमनापूर्वी शहरातील सर्वच रस्ते तात्काळ दुरुस्ती करावे अशी मागणी मनसेने केली आहे.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 06, 2025 14:03:29Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूर शहरात अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्यासाठी टक्कर मोर्चा.. तिघा तरुणांनी डोके फोडून घेत,प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधीचा केला निषेध..
अँकर - सांगलीच्या इस्लामपूरा मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि स्मारक व्हावे,या मागणीसाठी टक्कर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तिघा तरुणांनी रस्त्यावर आपले डोके आपटून, रक्त सांडत प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे.इस्लामपूरच्या तहसील कार्यालयासमोर एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आलाय,गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा,अशी मागणी करण्यात येत आहे.मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने मातंग समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर टक्कर मोर्चा काढण्यात आला,यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संतप्त तरुणांनी रस्त्यावर डोकं आपटून,आपलं रक्त सांडत अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे.
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 06, 2025 14:03:10Ambernath, Maharashtra:
बदलापूर पूर्व रिंग रूट परिसरात गुंडांचा दारू पिऊन धिंगाणा,
दिवसाढवळ्या पान टपरीची तोडफोड
Bdl tod fod
Anchor बदलापूर पुर्व रिंग रूट परिसरात एका पान टपरीवर काही गुंडांकडुन दगडफेक करून टपरीची नासधूस करण्यात आली आहे,पान टपरी मालकाने शासनाने बंदी घातली असलेला गुटखा दिला नसल्याचा राग धरत, टपरीतील सामानाची तोडफोड करण्यात आली आहे, दिवसाढवळ्या असा प्रकार घडत असल्याने पनवेल परिसरात दहशतिच वातावरण निर्माण झाल आहे, पनवेल हायवे परिसरात सातत्याने असे गुन्हेगारी प्रकार घडत असुन, बदलापूर पुर्व पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 06, 2025 14:02:46Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0608ZT_DAUNDYAVAT
FILE 1
यवत प्रकरणातील 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी.....
Anchor_ दौंड तालुक्यातील यवत प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना दौंड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. पुढील तपास कामी यवत पोलिसांनी न्यायालयाला आरोपींची दोन दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती,मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी अमान्य करीत 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.....
0
Report