Back
कोल्हापुरात महादेव मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी, हर हर महादेव!
PNPratap Naik1
Aug 04, 2025 03:15:44
Kolhapur, Maharashtra
Kop Mahadev Mandir
Feed :-
Anc :- आज दुसरा श्रावण सोमवार. कोल्हापुरात देखील अनेक महादेव मंदिरात सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. शहरातील रावणेश्वर मंदिर, कपिलेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिरातील मातृ लिंगेश्वर या सर्वच मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पूजा, अभिषेक घालत भक्त हर हर महादेवाचा गजर करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 04, 2025 04:18:19Dhule, Maharashtra:
Anchor - अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही या शिवारात बिबट्या मृत झाला, मोठी राजमोही शिवारातील संजयसिंग वळवी यांचा गुरांच्या गोठ्यात शेजारील आंब्याच्या झाडावर चढत झोपलीत उडी मारत असताना बिबट्याचा अपघात झाला आणि त्यात त्याच्या मृत्यू झाला आहे. अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्या आहेत. त्यामुळे या बिबट्याच्या अपघात झाला की घातपात झाला याबाबत वन विभागाकडून तपास सुरू आहे. परंतु मृत्यू अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या पंचनामा करत या बिबट्याच्या अंतिम संस्कार करण्यात आला आहे. अक्कलकुवा तळोदा तालुक्यातील बिबट्याने अनेकांच्या जीव घेतला आहे. तर पाळीव प्राणी देखील ठार केले आहेत. मात्र वन विभागाकडून कठोर अशा उपायोजना केल्या जात नाहीत, त्यामुळे मोठी राजमोही या शिवारात बिबट्याच्या झालेल्या मृत्यू संदर्भात वनविभागाकडून आता सखोल तपास केला जाणार असून याबाबत खरंच अपघात झाला की घातपात याबाबत तपास होणार आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 04, 2025 04:18:14Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0408ZT_WSM_LABOURER_DEATH
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशीम च्या मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथील रमेश आंधळे या शेतमजुराचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.शेतात दिवसभर मजुरी केल्यानंतर ते पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते.पोहत असताना तोल गेल्यामुळे ते विहिरीत बुडाले.पाण्याचा स्तर अधिक व मृतदेह खोलवर गेल्याने तो बाहेर काढणे कठीण झाले.ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. एक तासाच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.हलाखीच्या परिस्थितीत रमेश आंधळे रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवला असून याबाबचा अधिक तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 04, 2025 04:17:33kolhapur, Maharashtra:
नागपूर
लिंक assingment ला पाठवली त्यातील Tc
----
Tc
(19.53 तो 20.55)
विदर्भातील रोजगाराच्या संधी अजून वाढवायच्या आहे.त्यामुळे विदर्भाची गरिबी दूर करायची आहे. सुखी, समृद्ध, संपन्न.विदर्भ बनेल ज्यावेळेस कृषी आणि उद्योग क्षेत्रात चांगला विकास होईल.. इथल्या लोकांच्या आकांक्षा विकासासोबत जोडलेल्या आहे. गांधी आणि नेहरूंच्या दोन बाबी खूप प्रसिद्ध आहेत. नेहरू जी म्हणायचे की आम्हाला जास्तीत जास्त उत्पादन हवे आहे... तर गांधीजी म्हणायचे जास्तीत जास्त लोकांचा समावेश करून अधिकाधिक उत्पादन हवे..
रोजगार निर्मिती करणे हीच आमची सगळ्यात मोठी प्रायोरिटी असल्याचे गडकरींनी सांगितले
कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीस नागपूर कार्यालयाचे गडकरीच्या हस्ते उदघाट्न झाले.. यावेळी ते बोलत होते..
देशात चांगले रसते झाल्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट 16 वरून 10 टक्क्यावर आलीय... ती डिसेंबरपर्यंत 9 टक्क्यावर आणू असेही गडकरी म्हणाले..
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 04, 2025 04:17:23Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यामध्ये पारंपारिक कानबाई उत्सवाची धूम पाहायला मिळाली. कानबाई उत्सवानिमित्त घरोघरी विधिवत मातेची पूजन करण्यात आले. तसेच यावेळी सर्व कुटुंब एकत्र येत एकमेकांच्या भेटीगाठी घेतात. कानबाई माता ची स्थापना झाल्यानंतर ठिकठिकाणी रात्रभर नृत्य गीतांसह भक्तीचा जागर केला जातो. या निमित्ताने सर्व कुटुंब परिवार एकत्र आले असल्याने एक वेगळंच उत्साहाच आणि आनंदाच वातावरण खानदेशात दिसून येतं. विशेष म्हणजे पारंपरिक व विविध पद्धतीने मातेची स्थापना केल्यानंतर कानबाई मातेला रोटांचा नैवेद्य दाखवला जातो. हा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कानबाई मातेची विधिवत मिरवणूक काढत विसर्जन केल जातं.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 04, 2025 04:17:14Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Someshwar
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील श्री सोमेश्वर मंदिरात सोमवारी हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेलाय. अभिषेक, पूजन, आरती यामध्ये भाविकांनी सहभाग घेत भक्तीभाव व्यक्त केला.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 04, 2025 04:02:16Dhule, Maharashtra:
Anchor - धुळे शहरातील केंद्रीय विद्यालय परिसरामध्ये असलेल्या डोंगर रांगांवर वृक्षरोपणाचा कार्यक्रम नाशिक विभाग माडा तर्फे हाती घेण्यात आलेला आहे. यावेळी विविध सामाजिक संघटनांची मदत घेतली जात आहे. या परिसरामध्ये घनदाट वनक्षेत्र तयार करून नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आणि विरुगुळा केंद्र उभारले जातं आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्या मध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस आमदार अनुप अग्रवाल यांनी या वृक्षांसाठी दररोज पाणी देण्यासाठी व्यवस्था उभारून देण्याचा आश्वासन दिल. तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी वैद्यपूर्ण पर्यटन स्थळ विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला. नाशिक विभाग म्हाडाचे प्रमुख शिवकुमार आवळकंठे यांनी सामाजिक संघटनांना पुढे या ठिकाणी सहकार्य करण्याचा आवाहन केले.
byte - जयकुमार रावल पालकमंत्री
प्रशांत परदेशी धुळे
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 04, 2025 03:48:18kolhapur, Maharashtra:
2c ला फोटो आणि व्हिडिओ जोडले आहे
------
नागपूर
- *रामटेक तालुक्यातील नगरधन येथे कारवरील नियंत्रण सुटून कारचालकाने २५ ते ३० लोकांना कट मारला.*
- संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत कार चालवत होता. त्यामुळे त्याने २५ ते ३० लोकांना कट मारली. संतप्त गावकऱ्यांनी पाठलाग करत त्याला चांगलाच चोप दिला.
- ही घटना रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत नगरधन येथे रविवारी सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
- *हर्षपाल महादेव वाघमारे असे नाव असून, तो भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असल्याची माहिती आहे.*
- तो चार दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याचं सांगितलं जातं.
- नगरधनचा साई मंदिर, दुर्गा चौक मार्गे हमलापुरीकडे जात असताना कारवरील ताबा सुटला आणि बेदरकारपणे गाडी चालवत होता. कार नाल्यात जाऊन पलटी झाली.
- रामटेक पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील तरुणाला ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 04, 2025 03:46:41Ratnagiri, Maharashtra:
रविवारी संध्याकाळी रत्नागिरी राजाचं आगमन झालय...ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाच स्वागत रत्नागिरीकरांनी केलं.आपल्या लाडक्या राजाच्या आगमनासाठी अथांग जनसमुदाय लोटला होता....शहराच्या मुख्यद्वारापासून ही आगमन मिरवणुक निघाली...राजाच्या आगमन मिरवणुकीत उत्साह जल्लोष पहायला मिळाला...
ड्रोन सौजन्य - तन्मय दाते, रत्नागिरी
0
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 04, 2025 03:34:28Yeola, Maharashtra:
अँकर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवल्यात धडक कारवाई करून शरबजीत रामलाल यादव या परप्रांतीय नागरिकास बदलापूर रोड परिसरातून ताब्यात घेतले आहे
त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आले असून
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड योगिता काकड, यांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले आहे येवला शहर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहे.
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 04, 2025 03:15:41Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- औसा महामार्गावर दरोड्याचा कट उधळला... बीडच्या पाच जणांना अटक... तीन आरोपी अंधारात पसार... आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना....
AC ::- औसा-तुळजापूर महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून धारधार शस्त्रे आणि अन्य संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान अंधाराचा फायदा घेत तीन आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी पथके रवाना केले आहेत. विशेष म्हणजे, लातूर जिल्ह्यातील औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर आणि अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत घरफोड्या, दुकानफोडी आणि शटर तोडून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर औसा पोलीसांनी ही कारवाई करून मोठा कट उधळून लावल्याचं मानलं जातंय...
बाईट::- मंगेश चव्हाण (अप्पर पोलीस अधीक्षक )
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 04, 2025 03:15:26Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 0408_GON_DEATH_BODY
FILE - 5 VIDEO
25 ते 30 वर्ष वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला... गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी शेत-शिवारातील घटना.... मृतक महिलेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा... डूग्गीपार पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू...
Anchor : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी शेत-शिवारामध्ये एका 25 ते 30 वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला... खजरी येथील शेतकरी पहाटे आपल्या शेतात गेले असता महिलेचा मृतदेह त्यांना दिसला.. शेतकऱ्याने घटनेची माहिती डूग्गीपार पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून महिलेची ओळख पटविण्याकरिता पोलीस प्रयत्न करत आहेत...
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 04, 2025 03:15:18Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn samruddhi av
Feed attached
नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ७०१ किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास ऑनलाईन दंड आकारला जाणार आहे.
अपघात रोखण्यासाठी महामार्गावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विदर्भ-मराठवाड्यासह अहिल्यानगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. या महामार्गावर कारसाठी ताशी किमान १२० कि.मी. तर ट्रकसाठी ८० अशी वेगमर्यादा दिली आहे. मात्र त्याचे उल्लंघन होताना दिसते. त्यामुळे समृद्धी महामार्गावर लहान-मोठ्या वाहनांची वेगमर्यादा किती यावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. प्रत्येक १ किमी अंतरावर एक कॅमेरा बसवला जाणार आहे.किमान एक हजार कॅमेरे या महामार्गावर लागणार असून, त्याकरिता एमएसआरडीसीने दोन नामांकित कंपनीसोबत करार केला आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 04, 2025 03:04:08Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn farmer issue av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर मध्ये शासनाकडून अनुदान
लाटून शेडनेट न उभारणाऱ्या जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांच्या सातबारावर ६ कोटी ३० लाख रुपयांचा बोजा टाकण्यात आला आहे. पोकरा योजनेचा पहिला टप्पा वर्ष २०१८ ते २०२४ या कालावधीत राबविण्यात आला, यात शेतकऱ्यांसाठी शेडनेटची योजना होती. या योजनेच्या लाभार्थ्यांना शेडनेटच्या आकारानुसार १२ ते १७ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले होते. या योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतल्यापासून पुढील ५ वर्षे त्यांच्या शेतात शेडनेट ठेवणे बंधनकारक होते. मात्र जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांनी अनुदान पदरात पडल्यानंतर शेडनेट गायब केल्याचे कृषी विभागाच्या पडताळणीत आढळून आले होते. याप्रकरणी कृषी विभागाने या लाभार्थी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून अनुदानाची रक्कम परत करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांनी या नोटिसांना केराची टोपली दाखविली.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 04, 2025 03:03:16Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 0408_GON_RAILWAY
FILE - 4 VIDEO
रीवा-पुणे, जबलपूर-रायपूर या दोन एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत.... खासदार प्रशांत पडोळे यांनी दाखविली हिरवी झेंडी
Anchor : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी तीन महिन्यांपूर्वी रीवा-पुणे आणि जबलपूर-रायपूर एक्स्प्रेस सुरु करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता या दोन्ही गाड्या सुरू झाल्या आहेत. गोंदियाकरांना याचा मोठा आनंद आहे. *जबलपूर रायपूर* या गाडीला आमदार विनोद अग्रवाल, आणि खासदार प्रशांत पडोळे यांनी या गाडीचे स्वागत करत हिरवी झेंडी दाखविली आहे. रीवा जबलपूर या रेल्वेगाडीमुळे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश या तीन राज्यांतील प्रवाशांना या दोन्ही गाड्यांचा लाभ होणार आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. या गाडीमुळे निश्चितच तीन राज्याला याचा फायदा होणार असून.नवेगावबांध-नागझिरा
व्याघ्र प्रकल्प, कान्हा
केसरी राष्ट्रीय उद्यान, उज्जैन, भोपाळ, अमरकंटक, ग्वालियर, ओंकारेश्वर याठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या
पर्यटकांना मदत होणार आहे.
0
Report