Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Hingoli431513

अँकर- हिंगोली रेल्वे स्थानकावर आग! जाणून घ्या नेमकं काय झालं!

GDGAJANAN DESHMUKH
Aug 06, 2025 04:32:31
Hingoli, Maharashtra
अँकर- हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर रेल्वेचे तीन डबे रेल्वे ट्रक सोडून उभे केले आहेत, या डब्यातील मधल्या डब्याला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आलीय, ही आग नेमकी कशी लागली की कुणी लावली हे अद्याप कळू शकले नाही, आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले असून अग्निशामक दलाच्या वतीने आग विझविण्याचे काम सुरू आहे, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही... सदर रेल्वे ही मुख्य ट्रॅकवर नसल्याने वाहतुकीला ही कुठलाच अडथळा झाला नाहीये...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Aug 06, 2025 06:33:24
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जीवघेण्या खड्ड्यांपासून आपला बचाव करण्यासाठी सोलापूरकरांची अनोखी शक्कल - सोलापूर शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य - जीवघेण्या खड्ड्यांपासून आपला बचाव करण्यासाठी सोलापूरकरांची अनोखी शक्कल - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवी पेठ दरम्यानच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यात खुर्ची ठेवत वाचवला जातोय जीव - आजपर्यंत अनेक जण या खड्ड्यात पडून जखमी झाल्याची स्थानिकांची माहिती - शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे सोलापूरकर घेतायेत आपापल्या पद्धतीने काळजी - खड्ड्यात खुर्ची ठेवणं ही गोष्ट साधी जरी वाटत असली तरी या एका प्रयोगामुळे शेकडो सोलापूरकर या खड्ड्यात पडण्यापासून वाचत आहेत
0
Report
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 06:32:29
Nashik, Maharashtra:
nsk_guncontro feed by 2C vidoe 2 anchor इंदिरानगर परिसरातील मुख्य रस्त्यावरून विरुद्ध बाजूने माजी नगरसेवक संशयित यशवंत निकुळे यांनी मंगळवारी कार चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला कट दिला. यामुळे दुचाकी चालक शिक्षकाने त्यांना 'हा काय प्रकार आहे गाडी चालवायचा..?" असे विचारल्याने निकुळे यांचा पारा चढला अन् त्यांनी शिवीगाळ करत कारच्या डॅशबोर्डमधून पिस्तूल काढत शिक्षकावर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली, याप्रकरणी निकुळे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास श्रद्धाविहार कॉलनीतून वडाळा- पाथर्डी रस्त्यावरून निकुळे हे त्यांच्या मोटारीतून विरुद्ध बाजूने प्रवास करत होते. समोरून द्चाकीने फिर्यादी सिंग हे जात होते. त्यांच्या मोटारीने सिंग यांच्या 'दचाकीला कट दिला. निकुळे यांना या प्रकाराबाबत विचारले असता यांनी थेट पिस्तूल काढून 'तुला मारून टाकीन. असे" म्हणून धमकावले.
0
Report
AKAMAR KANE
Aug 06, 2025 06:02:59
kolhapur, Maharashtra:
नागपूर पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..याबाबतपालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाकडून तक्रारही दाखल करण्यात आली होती.राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्या तीन इसमांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराची तातडीने गंभीर दखल घेत स्वतः पालकमंत्री बावनकुळे यांनी या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या घटनेबाबत पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाने रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात माहिती अशी की, 3 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कामठी मार्गावरील ईडन ग्रीन्स लॉन येथे काही लोकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, याठिकाणी पोलिसांनी परवानगी देताना आखुन दिलेल्या अटी व शर्थीचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस याठिकाणी कार्यवाहीसाठी गेले असता आरोपी वेदांत छाबरिया रा. नागपूर, रितेश चंद्रशेखर भदाडे, रा. वाडी, आकाश बनमाली सालम यांनी पोलिसांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने दमदाटी केली. या घटनेचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बावनकुळे यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी तातडीने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी बोलून सबंधित इसमांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाने जुनी कामठी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार देखील दाखल केली. त्यानुसार उपरोक्त तीन आरोपींविरुद्ध 293, 221, 223 सहकलम 33(A), (W), (¡¡¡), 1 31, 1 35 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ------------- नागपूर बाईट - निकेतन कदम, पोलीस उपायुक्त... - कामठी पोलिसाच्या हद्दीत फ्रेंडशिप डे च्या निमित्त पार्टीचा आयोजन केलं होतं... मात्र यात पार्टीत दिलेल्या नियम आणि अटी शर्तीचा उल्लंघन करत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने धमकी देणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल..... - पालकमंत्री चंद्रशेखर यांच्या सूचनेवरून गुन्हा दाखल... - वेदांत छाबरिया, रितेश भदाडे, आकाश सालम या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे... - जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ईडन ग्रीन्स लोन या ठिकाणी पार्टीच आयोजन करण्यात आलं होत... - यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बदनामी केल्यामुळे त्यांच्याही कार्यालयातून कामठी पोलिसात तक्रार देण्यात आली... - पोलिसांना पार्टीत वाद झाल्याची पार्टीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पोलिसांनी आयोजकांना सूचना केल्यात...मात्र त्या ठिकाणी इव्हेंट ऑर्गनायझर यांना विचारणा केली असता धमकावत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगेलं अशी धमकीच चक्क पोलिसांना दिली..त्यामुळे कामठी पोलिसात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.. - याशिवाय शासकीय कामात अडथळा आणण्याचाही प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही नावाचा गैरवापर केल्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती दिली... - राजकीय व्यक्तीचा किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाचा वापर करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी केली..
0
Report
AKAMAR KANE
Aug 06, 2025 05:49:35
kolhapur, Maharashtra:
Ngp Bhagwat program live u ने फीड पाठवले --- नागपूर - धर्म जागरण न्यास प्रांत कार्यालयाच लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे - थोडयाच वेळात कार्यक्रमाला सुरवात होणार आहे, - भगवान नगर येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडत आहे... लाईव्ह फ्रेम
0
Report
GMGANESH MOHALE
Aug 06, 2025 05:49:30
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0608ZT_WSM_HUMANI_LAVAE रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिम च्या मानोरा तालुक्यात खरीपा च्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकांला बसत आहे.रुई गोस्ता येथील शेतकरी गजानन शालिग्राम गावंडे यांच्या दीड एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.अतिवृष्टीमुळे आधीच संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता हुमणी अळीमुळे आणखी भर पडली आहे.गजानन गावंडे यांनी आपल्या शेतातील संपूर्ण पीक हुमणी अळीमुळे नष्ट झाल्याने शेवटी हताश होऊन त्यानी दीड एकर क्षेत्रावर ट्रॅक्टर फिरवून पीक उठवून टाकले. त्यामुळे त्यांचे मोठ नुकसान झाले असून या हंगामात त्यांना कोणतेही उत्पन्न मिळणार नसल्याचे आर्थिक विवंचनेत पडले आहेत. या वाढत्या प्रादुर्भावाची गंभीर दखल घेऊन कृषी विभागाने तातडीने हालचाल करून कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा इतर शेतकऱ्यांचीदेखील अशीच अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 06, 2025 05:49:14
Beed, Maharashtra:
बीड: जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागाला आग, सुदैवाने जीवितहानी नाही... Anc- बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागाला आग लागली. आगीनंतर रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अपघात विभागात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे निदर्शनास आले आहे. कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली. यावेळी सर्व रुग्णांना बाहेर काढून नातेवाईकांना देखील रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आले. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा आहे. यापूर्वीच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रुग्णालयाचे काम पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहे.
0
Report
GMGANESH MOHALE
Aug 06, 2025 04:48:39
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0608ZT_WSM_ZP_RESERVATION रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे,अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत होती. मात्र,न्यायालयाने या संदर्भात निर्णय देताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणानुसारच घेण्यात याव्यात,असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.या निर्णयानुसार वाशिम जिल्हा परिषदेतील एकूण ५२ जागांपैकी ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गासाठी पूर्वीप्रमाणेच १४ जागा आरक्षित राहतील.त्याचप्रमाणे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी ११ जागा, अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी ४ जागा तर खुल्या प्रवर्गासाठी २३ जागा राखीव असतील.यामध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण कायम राहणार आहे, त्यामुळे सर्व प्रवर्गांमध्ये महिलांचे समावेश सुनिश्चित करण्यात आला आहे.
0
Report
SMSATISH MOHITE
Aug 06, 2025 04:47:08
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_MLA Feed on - 2C ------------------------------ Anchor - मी प्रत्येक वेळी वेगळ्या पक्षातून निवडून आलो त्यामुळे तुमची पहिली वेळ असल्याचे सांगून मला मंत्रिपद मिळाले नाही. पण माझी सिनियरिटी काउंट करण्याचा आणि न्याय देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. तुमच्या मनातील ज्या भावना आहेत त्या परमेश्वर लवकर पूर्ण करेल असे म्हटले तर चुकीचे होणार नाही असेही चिखलीकर म्हणाले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. चिखलीकर यांच्या या वक्तव्याने मंत्रिपद मिळवण्याची त्यांची इच्छा पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आली. Sound Byte - आ. प्रताप पाटील चिखलीकर --------------------------
0
Report
PNPratap Naik1
Aug 06, 2025 04:33:04
Kolhapur, Maharashtra:
Kop Maratha Samrajya Waad आत्ताची सर्वात मोठी बातमी. Anc :- जसलमेरच्या राज परिवाराने NCERT च्या इयत्ता 8वी पुस्तकात असणाऱ्या मराठा साम्राज्याच्या नकाशाला विरोध केला आहे. आठवीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा चुकीचा असल्याचा सांगून तो काढून टाकावा अशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी केलीय. चैतन्यराज सिंग यांनी X वर ट्विट करत ही मागणी केली आहे.. NCRT ने प्रकाशित केलेल्या 8 वीच्या सामान्य ज्ञान पुस्तकाच्या युनिट 3 मधील पान नंबर 71 मध्ये दाखविलेल्या नकाशामध्ये जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे. तो ऐतिहासिक दृष्टीने पूर्णतः चुकीचा असल्याचे म्हटलय. पूर्णतः अनऐतिहासिक तथ्यांवर आधारित असणार हे पुस्तक म्हणजे NCERT च्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. अशा प्रकारचा इतिहास म्हणजे आमच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणारी आहे.. इतकच नाही तर आमच्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाचा अपमान आहे असं देखील चैतन्यराज सिंग यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.. जैसलमेरच्या कोणत्याही ऐतिहासिक साधनांमध्ये मराठा समाजाचे आधीपत्य, आक्रमणाचा कोणताही उल्लेख नसल्याचे म्हटले आहे...चैतन्यराज सिंग यांनी अशा प्रकारचे ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 06, 2025 04:32:23
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_R2_FIR ठाकरे गटाच्या युवासेनेच्या महिला नेत्या मनीषा वाघमारे यांची ७ लाखांची फसवणूक शासकीय टेंडर मिळवून देतो अशी बतावणी पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी आरोपी प्रयास उर्फ शंभुराजे भोसले याच्यावर आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल Anchor धाराशिवमध्ये शासकीय टेंडर मिळवून देतो, असे सांगून ठाकरे गटाच्या युवासेनेच्या राज्य सचिव मनीषा वाघमारे यांची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. पैसे परत मागितल्यावर शासकीय कामात अडथळा आणतो आणि जीवे मारतो, अशी धमकी आरोपीने दिली. या प्रकरणी साताऱ्यातील प्रयास उर्फ शंभुराजे दत्तात्रय भोसले (रा. होळ, ता. खटाव) याच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात फसवणूक व धमकीचे गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा वाघमारे यांनी ४ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन महिन्यांत ७ लाखांच्या बदल्यात १० लाख देतो असे आमिष दाखवले होते. परंतु मुदत उलटल्यानंतर पैसे परत न देता, महिलेला धमकी दिली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
Report
GMGANESH MOHALE
Aug 06, 2025 04:20:30
Washim, Maharashtra:
वाशीम: File:0608ZT_WSM_SORGHUM_PRICE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर : वाशिमच्या बाजारात ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली असून परिणामी आवकही घटलीये सध्या ज्वारीला अवघा १ हजार ५१० ते १ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळतोय. हा दर सरकारने जाहीर केलेल्या ३ हजार ३७१ रुपयांपेक्षा तब्ब्ल १६०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळं सरकारनं नाफेड मार्फत ज्वारीची हमीभावानं खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय.
0
Report
MNMAYUR NIKAM
Aug 06, 2025 04:20:22
Buldhana, Maharashtra:
खामगाव येथील व्यापाऱ्याचा विहिरीत हातपाय बांधलेला मृतदेह आढळला.* *मलकापूर तालुक्यातील धानोरा येथिल घटना.* *दोन दिवसांपूर्वी हरविल्याची तक्रार होती दाखल ,परिसरात उडाली खळबळ ..* *घातपाताची शक्यता असल्याने पोलिस तपास सुरू.* Anchor - मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील एका विहिरीत हातपाय बाधलेला 48 वर्षीय व्यक्ती चा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली .. याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून घटनेचा तपासा सुरू केला आहे .. विहिरीतील मृतदेह हा खामगाव येथील व्यापारी असलेले घनश्याम भुतडा यांचा असल्याचे समोर आल असून मृतदेह हातपाय बांधलेला अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसाना घातपाताची शंका बळावली असून त्यादृष्टीने तपास सुरू केलाय.. तर मृतकाचे नातेवाईकांनी सुद्धा घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केलीय. बाईट - मृतकाचा मुलगा.
0
Report
MNMAYUR NIKAM
Aug 06, 2025 04:18:40
Buldhana, Maharashtra:
दुर्दैवी 'हुमणी'चा विळखा... शेतकऱ्याने फिरवला 15 एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर Anchor - बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करत, मोठ्या आशेने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावर हुमणी अळीने थैमान घातलं आहे. हिरवीगार शेतं डोळ्यासमोर करपून जात असताना, हतबल झालेला शेतकरी आपल्याच पिकावर ट्रॅक्टर फिरवताना दिसतोय. हे दृश्य मन हेलावून टाकणारं आहे. खामगाव तालुक्यातील वडजी भेंडी गावातील शेतकरी विजय मुंढे यांच्या वेदनाही अशाच आहेत. 15 एकर शेतात त्यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीनची लागवड केली होती. पण हुमणी अळीच्या प्रकोपामुळे उभं पीक मातीमोल झालं. ही परिस्थिती पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. काळजावर दगड ठेवून त्यांना आपल्याच 15 एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला. आजोबा-पणजोबांपासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही, तर ती त्यांची ओळख आणि जीवन आहे. आपलं पीक असं नष्ट झालेलं पाहणं, हे त्यांच्यासाठी एखाद्या अपत्याला गमावण्यासारखं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मुंडे यांच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 06, 2025 04:15:54
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_CONGRES धाराशिव मध्ये काँग्रेसला धक्का. दोनशे पदाधिकाऱ्यांनी केला मुंबईत भाजपामध्ये प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवराज पाटील धाराशिव च्या राजकारणात सक्रिय. अँकर धाराशिव_ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,सरपंच डीसीसी बँकेचे संचालक अशा जवळपास 200 काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी काल मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे. नुकतेच काँग्रेस मधून भाजपा मध्ये गेलेले माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवराज पाटील पुन्हा एकदा धाराशिवच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. बसवराज पाटील हे सध्या लातूर ग्रामीणचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत.
0
Report
Advertisement
Back to top