Back
श्रीरामपूर बस चालक नशेत, प्रवासी थोडक्यात बचावले!
PPPRASHANT PARDESHI
Aug 03, 2025 16:45:08
Dhule, Maharashtra
ANCHOR - श्रीरामपूर सुरत बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने अपघात होता होता थोडक्यात वाचवला आहे. ही बस श्रीरामपूर होऊन सुरत कडे जात होती. यां बसच्या अपघात नवापूर जवळ झाला. या बस मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी होते, त्यामुळे सर्वे प्रवासी थोडक्यात बचावले आहेत बस चालक नशेत असल्याने, गाडी वेगात चालवत होता, प्रवाशांकडून वारंवार सांगण्यात देखील बस हळू चालवत नसल्याने शेवटी अपघात झाला, असा दावा प्रवश्यानी केला आहे. बसमधील प्रवासी सर्वे सुखरूप आहेत परंतु प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. मोठ्या दगडामुळे बस थांबले अन्यथा घाटात बस कोसळली असते. सध्या प्रवाशांना दुसरी बसमध्ये बसून पुढे पाठवण्यात आलं आहे तर महामंडळाकडून या चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 05, 2025 15:04:12Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Kidnap Twist
File:07
Rep: Hemant Chapude(Khed)
“सैराट निघाला गैराट”
SLUG:
सैराट निघाला गैराट… खरपुडीतील आंतरजातीय विवाह प्रकरणात नवीन वळण
ANCHOR:काल पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं खरपुडी गाव संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरलं... कारण होतं – विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांचा आंतरजातीय विवाह. मात्र हा विवाह काहींना मान्य नव्हता… आणि त्यातूनच सुरू झाली एक सैराटसदृश घटना… पण आज या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे…
Vo...खरपुडी गावातील प्राजक्ता आणि विश्वनाथ गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला… पण प्राजक्ताच्या कुटुंबियांचा याला तीव्र विरोध होता.
त्यामुळेच तिच्या आई, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी प्राजक्ताला मारहाण करत जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार घडला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सैराटसारखी कथा खऱ्या आयुष्यात घडल्याचं चित्र निर्माण झालं.
Byte: विश्वनाथ गोसावीचा व्हिडिओ
(व्हिडिओचा छोटा अंश दाखवावा – "माझ्या पत्नीचं अपहरण झालंय... तिला धोका आहे")
Vo...ही घटना गंभीर बनली आणि खेड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला.
संध्याकाळपर्यंत प्राजक्ताच्या वडील, आई आणि भाऊ प्राजक्ताला घेऊन थेट खेड पोलीस ठाण्यात आणत कोर्टात हजर केलं
Byte: अमोल मांडवे, पोलीस उपविभागीय अधिकारी:
Vo...प्राजक्ताने पोलिसांसमोर स्पष्ट भूमिका घेत, "माझ्या आई-वडिलांना आणि पतीला काहीही त्रास होऊ नये," असं सांगितलं. तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
मात्र, दुसरीकडे काशीद कुटुंबियांनी विश्वनाथ गोसावीबद्दल गंभीर आरोप केले आहेत.
"विश्वनाथ याचं आधीचं लग्न झालं आहे, आणि त्यांनी हे लपवलं. तसंच त्यांच्या आश्रमात अंधश्रद्धा पसरवली जात आहे, हे सत्य बाहेर यावं."
या आश्रमात ४० हून अधिक गाड्या, आलिशान खोल्या, आणि मोठी शेती असल्याची माहितीही समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर विश्वनाथ गोसावीचं चारित्र्य, त्याचं पूर्वीचं लग्न, आणि प्राजक्ताशी झालेलं नातं यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Byte: राजाराम काशिद (प्राजक्ताचे वडील)
Byte: वकील निलेश आंधळे (आरोपींच्या वतीने):
End Vo...तर खरपुडीतील सैराटसदृश प्रकरण आता अनेक वळणं घेत आहे...
मुलीच्या जबाबावर, आरोपींच्या चौकशीवर, आणि पोलिसांच्या तपासावर हे प्रकरण अवलंबून राहिलं आहे.
खरंच... सैराट निघाला गैराट...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 05, 2025 14:00:38Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - जम्मू-कश्मीर मधील सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी एक हजार तरुण विशेष रेल्वेने रवाना - मंत्री उदय सामंतांनी दाखवला झेंडा.
अँकर - देशाच्या जवानांच्यासाठी जम्मू कश्मीर मध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्स्प्रेस विशेष रेल्वे रवाना झाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते यावेळी विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला.एक हजार तरुण 9 ऑगस्ट रोजी जम्मू कश्मीर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ महाराज शिंदे यांच्या उपस्थितीत
पार पडणाऱ्या सिंदूर महा रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत,यावेळी रक्तदात्यांना उदय सामंत यांनी शुभेच्छा देत,जवानांना रक्तदान करणारे रक्तदाते नसून रक्तवीर असुन यापुढे जवानांना रक्तदान करणाऱ्यांना रक्तवीर म्हणून संबोधले जाईल,असा विश्वास व्यक्त केला.शिवसेना शिंदे गटाचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंदूर रक्तदान शिबिराचा आयोजन थेट जम्मू- काश्मीरमध्ये करण्यात आले आहे.
बाईट - उदय सामंत - उद्योग मंत्री.
बाईट - चंद्रहार पाटील - डबल महाराष्ट्र केसरी
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 05, 2025 14:00:18Vasai-Virar, Maharashtra:
Date-5aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI ST BUS
Feed send by 2c
Type-AV
Slug-- महामार्गावर अर्नाळा- पंढरपूर एसटी बसला अपघात
अँकर - एसटी महामंडळाच्या अर्नाळा -पंढरपूर बसला महामार्गावरील वसईच्या सातिवली खिंडीजवळ अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी बसमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
सकाळच्या वेळेत पंढरपूर-अर्नाळा एसटी बस विरार पश्चिमेच्या अर्नाळा आगरातून पंढरपूरला जाण्यासाठी रवाना झाली होती. यावेळी सातिवली खिंड येथून जात असताना बसला मागून डंपरची धडक दिली. या धडकेमुळे बस समोरच्या डंपरला धडकली त्यामुळे हा अपघात घडला.
यावेळी बसमधून १० प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी दोन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय अर्नाळा आगाराचे पथक ही घटनास्थळी पोहचले.
या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 05, 2025 13:33:30Ambernath, Maharashtra:
वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची दूरवस्था
वांगणीकरांना दररोज
खड्ड्यातून करावा लागतो प्रवास
रस्ता दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष
Vangani road
Anchor - वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची पुरती दुरवस्था झालीय. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहनं चालवणही कठीण होऊन बसलय. मात्र या खड्डेमय रस्त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केलय.
वांगणीत पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा एकमेव रस्ता आहे. मात्र पूर्वेकडील रस्त्यावर रेल्वे फाटकातच खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी बाईकस्वार पडून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केल्याचं दिसून येत नाहीत. भर पावसात या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं असतं. रेल्वे फाटकातील या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनं पूर्व-पश्चिम भागात ये-जा करत असतात. वांगणी पश्चिमेकडे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे रुग्णांना देखील याच रस्त्यावरून जावं लागतं. शिवाय विद्यार्थीही स्कूल व्हॅन मधून याच रस्त्यावरून ये-जा करतात. या सगळ्यांनाच वांगणी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांमधून होतीय.
चंद्रशेखर भुयार , वांगणी
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 05, 2025 12:49:07Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 0508ZT_INDAPURSAND
FILE 2
इंदापूरमधील गंगावळणात अवैध वाळू उपसा उघड, ४८ हजारांचा साठा पोलिसांच्या ताब्यात..
भीमा नदीतून यांत्रिक बोटीने वाळू उपसा एकावर गुन्हा दाखल...
Anchor — इंदापूर तालुक्यातील गंगावळण गावच्या हद्दीत उजनी जलाशयातील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता नंदकुमार गलांडे असं आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून ४८ हजार रुपये किमतीची आठ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.ग्राममहसूल अधिकारी करिष्मा मोहनराव बोबडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. यामध्ये यांत्रिक बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा करून साठवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 05, 2025 12:32:44Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0508ZT_JALNA_MOSAMBI(1 FILE)
जालना : बाजार समितीत 5 दिवसांत 2 हजार 185 क्विंटल मोसंबीची आवक,
अँकर :जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 5 दिवसांत 2 हजार 185 क्विंटल मोसंबीची आवक झालीय.मोसंबीला सरासरी 950 रुपये क्विंटल बाजारभाव मिळालाय.कमी बाजारभाव मिळत असल्यानं मोसंबीची आवक काही प्रमाणात घटली आहे.आणखी काही दिवस मोसंबीची आवक वाढण्याची शक्यता कमी आहे.मोसंबीचे दर घटल्यानं मोसंबी उत्पादक शेतकरी दरात वाढ होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 05, 2025 12:17:20Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0508ZT_JALNA_RATION(4 FILES)
जालना : जिल्ह्यातील 3 लाख 36 रेशन लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी
ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डवरून मिळणारे धान्य बंद होण्याची शक्यता
धान्य मिळणं बंद झाल्यास लाभार्थीच जबाबदार राहतील-जिल्हा पुरवठा अधिकारी
अँकर : जालना जिल्ह्यात रेशनचे 15 लाख 89 हजार 888 लाभार्थी आहेत.यापैकी 9 लाख 24 हजार 255 लाभार्थ्यांनी ई -केवायसी पूर्ण केलं आहे.मात्र उर्वरीत 3 लाख 36 हजार 97 लाभार्थ्यांनी ई -केवायसी केलेलं नाही.त्यामुळे या ई -केवायसी न करणाऱ्यांचं रेशन बंद होण्याची शक्यता आहे.याबाबत पुरवठा विभागाकडून स्पष्ट सूचना किंवा आदेश आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे तातडीने रेशनच्या लाभार्थ्यांनी त्यांचं ई-केवायसी पूर्ण करावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी दिलाय.ई-केवायसी न करणाऱ्यांमध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील लहान मुलं,वयोवृद्ध यांचा समावेश आहे.वयोवृध्दांचे थम न येणं,आधारकार्ड आणि रेशनकार्डमधील नावांमध्ये फरक असणं या कारणांमुळे हे ई-केवायसी पेंडिंग असल्याचं समोर आलं आहे.दरम्यान लाभार्थ्यांनी त्यांचं ई-केवायसी याच महिन्यात पूर्ण करून घेण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलं आहे.ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचं धान्य मिळणं बंद झाल्यास त्याला लाभार्थीच जबाबदार असतील असा ईशाराही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना दिलाय.
बाईट : सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी,जालना
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 05, 2025 12:05:14Bhandara, Maharashtra:
अखेर परिणय फुके यांनी जाहीर माफी मागितली....
Anchor :- 1 ऑगस्टला भंडारा येथे कार्यकर्ता मेळाव्यात परिणय फुके यांनी मीच शिवसेनेचा बाप आहे. अस वक्तव्य केलं होत. त्यावर शिवसेनेच्या वतीने राज्यभर प्रतिक्रिया उमटत होत्या अखेर
भाजपा आमदार परिणय फूके यांनी जाहीर माफी मागितली आहे...
भारतीय जनता पार्टीच्या भंडारा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आहे. वास्तविक मला तसे बोलायचे नव्हते. कुणाला दुखविण्याचा माझा हेतू सुद्धा नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.
परंतु माझ्या विधानामुळे आमच्या मित्र पक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भावना दुखविल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. अस या पत्रात लिहिलं आहे....
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 05, 2025 12:02:58kolhapur, Maharashtra:
Ngp Ai Aganwadi --Mumbai-मराठी
इस slug से फीड Noida भेजा है
-------------------------
Shots -- AI अंगणवाडी के डिटेल शॉट भेजे है.... बच्चो के साथ सिखाते हुए VR, tab के साथ
-----------------
END PTc
-----------------------------------
बाईट --
कैलास घोडके, Dy CEo, महिला व बालविलास
-------------------------------------
बाईट
सरोज कुकडे-- अंगणवाडी सेविका
------------------
बाईट-- अंगणवाडी जानेवाले बच्चे के दादाजी
-----------------------------
बाईट-- अंगणवाडी जानेवालले बच्चे की माता
-------------------------*-------------
बाईट
-- AI अंगणवाडी के अंदर से मे एक wkt किया है
---------------*---------------------
देश की पहिली AI संचलित अंगणवाडी
नागपुर जिल्हे के वडधामना गावं मे शुरू हुई है... इस अंगणवाडी मे 3 से 6 साल के बच्चे AI टेक्नॉलॉजी की मदत से व्हर्च्युअल रियालिटी के जरिए पढाई कर रहे है.. जिल्हा परिषद के मिशन बाल भरारी के अंतर्गत शुरु हुई इस आंगनवाडी को AI टेक्नॉलॉजी से लैस बनाया गया है.
महाराष्ट्र सरकार की मदत से नागपुर जिल्हा परिषद द्वारा इसे बनाया गया है. इस आंगनवाडी की खास बात ये है की यहा AI टेक्नॉलॉजी की मदत से स्पेशल डिझाइन किए पाठ्यक्रम की मदत से बच्चे पढते है.
--------------------
बाईट--- कैलास घोडके डेप्युटी सीईओ महिला व बालविकास
----------------------
Vo--तकनीक की ताकत से अब देश का भविष्य और भी मजबूत बन रहा है... आंगनवाडी के टीचर बच्चे को डिजिटल डॅशबोर्ड के जरिए पढा रही है. 3 से 6 वर्ष आयु के बच्चे वर्चुअल रियालीटी की मदत से पढ रहे है. टीचर एक टॅब की मदत से VR को जोडती है जिसके बाद बच्चे VR के जरीए प्राणी, अंक, ,फल, चित्र, व्हीडिओ के जरिए पहचान करते है.
देखीए कैसे तोता उडता है और बच्चे खुशी से VR के जरिए पढ रहे है. शेर हाती के बारे मे बताते है
यहा बैठे बैठे छात्र गार्डन मे होने का आनंद भी लेते है.
-------------
बाईट
Amar Kane wkt
or
बाईट
सरोज कुकडे अंगणवाडी सेविका बाईट
------
बाईट--- बच्चे VR देखते है बाईट दे रहे है
--------------
vo---
बच्चों की पढ़ाई से लेकर पोषण तक, अब टेक्नोलॉजी रखेगी हर पल नजर...स्मार्ट क्लास, डिजिटल हाजिरी, और मोबाइल ऐप के ज़रिए माता-पिता भी जुड़े रहते हैं बच्चों की प्रगति से...AI टेक्नोलॉजी की मदद से बच्चों के वजन, कद और स्वास्थ्य की नियमित जांच होती है...महाराष्ट्र सरकार की मदत से नागपुर जिल्हा परिषद की शिक्षा क्षेत्र मे यह सराहनिय पहल अब देशभर में और आंगनवाड़ियों को हाईटेक बनाने की दिशा में मील का पत्थर मानी जा रही है... ये अंगणवाडी में एआय शुरू होने से पहले 8-10 बच्चे आते थे लेकिन अभी पच्चीस बच्चे अंगणवाडी पोहोच रहे है.... ए आय की मदत से सिखाये जाने वाले पाठ्य उन्हे बेहद पसंद आ रहे है... छुट्टी की दिन मे भी स्कूल जाने का आग्रह धरते है
---=--------
बाईट- डॉ. कैलास घोडके- डेप्युटी सीईओ, जिल्हा परिषद, नागपुर
----------
vo--- इसAI संचालित अंगणवाडी मे स आनेवाले बच्चो के अभिभाव इस उपक्रम से बेहद खुश है... बच्चे मे अच्छी प्रगती भी देख रहे है
---------
बाईट--मोहम्मद इसार,
बच्चे के दादाजी
---
बाईट- मनिषा बंडाटे- अभिभावक
0
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 05, 2025 12:02:09Pandharpur, Maharashtra:
05082025
Slug - PPR_SHKATIPITH_OPPOSE.
file 01
--
Anchor - सांगोला तालुक्यातील बलवडीमध्ये शक्तिपीठ महामार्गाची मोजणी झाली. पण सीमांकनासाठी आलेल्या पथकाला बाधित शेतकऱ्यांनी विरोध करत रोखले आहे.
शक्तिपीठ महामार्गाची सीमांकन प्रक्रिया बलवडी येथे भूमिअभिलेख, महसूल, कृषी आदी विभागाची संयुक्त मोजणी झाली. परंतु बाधित शेतकरी दादासो वाघमोडे व इतर बाधित शेतकऱ्यांनी विरोध केल्याने सीमांकनास आलेले पथक परत फिरले. शेतकऱ्यांनी शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एक जिद्द शक्तिपीठ रद्द अशा घोषणा दिल्या
बलवडीत शेतकरी वर्गाने एकत्र येऊन शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध असून, अधिकारी वर्गाने बळजबरी करू नये, शेतकरी वर्गाने एकजुटीने संघर्षासाठी तयार राहावे, असे आवाहन शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन देशमुख यांनी केले.
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 05, 2025 12:02:00Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_MLA_MEET
मराठा आरक्षण लढ्यातील विजया शिवाय फेटा बांधणार नाही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका
धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून फेटा बांधण्यास नकार
29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार
मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिवमध्ये गाठीभेटी दौरा , मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय सहभाग घेणार असल्याचं आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं
महाविकास आघाडी आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असेल आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं
Byt: प्रवीण स्वामी, आमदार शिवसेना उद्धव ठाकरे
0
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 05, 2025 11:45:31Niphad, Maharashtra:
अँकर:-
निफाड येथील कांदा उत्पादक शेतकरी गोपाळराव संपत गाजरे यांनी पाच लाख रुपये खर्च करत नऊ बिगे म्हणजे साडेचार एकर शेतामध्ये उन्हाळ कांद्याचे पीक घेतले पीकही जोमदार आले मात्र कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतामध्ये चाळ बांधत त्यामध्ये 700 क्विंटल कांदा साठवला होता मात्र रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींने कांद्याची साठवलेली चाळच जाळून टाकल्याने हातातोंडाशी आलेला घास फिरवल्यामुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न तसेच घेतलेले सोसायटीचे 12 लाख रुपयांचे कर्ज फेडावे कसे मोठा प्रश्न उभा राहिला आहे या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेत संबंधितावर कठोर कारवाई करावी तसेच शासनाने कर्ज माफ करावे किंवा भरघोस मदत करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे
बाईट :- संतोष गोपाळराव गाजरे (शेतकरी)
0
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 05, 2025 11:34:37Pandharpur, Maharashtra:
05082025
Slug - PPR_JALABHISHEK
file 01
-----
Anchor - पावसासाठी ग्रामदैवताला ग्रामस्थानी केला जलाभिषेक
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या सलगर बुद्रुक या गावामध्ये चालू हंगामामध्ये पाऊस न पडल्याने शेती व शेतीवर आधारित असलेले उद्योगधंदे संकटात सापडले आहेत. खरिपाची सर्व पिके वाया गेल्यात जमा आहेत. जनावरांच्या चारयाचा व पाण्याचाही प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे श्रावण महिन्या निमित्त गावचे ग्रामदैवत नंदी बसवण्णा यांना जलभिषेक करण्यात आला. मे महिन्यात समाधानकारक अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाची पेरणी केली. पण नंतर गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने उगवून आलेला खरीप वाया गेला आहे. चालू मॉन्सून हंगामातील मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य व आता सुरू असलेला आश्लेषा नक्षत्र सुद्धा वाया जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
0
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 05, 2025 11:19:42Lasalgaon, Maharashtra:
अँकर:-
लासलगाव येथील बाजारतळ शेजारी असलेल्या सुकेणकरचाळीत 80 वर्षी वयोवृद्ध महिलेच्या अंगावर पाणी ओतून तोंडावर कपडा टाकून गळ्यातील सोन्याचे ओम पान व सोन्याचे मनी असलेली चार ते पाच ग्रॅमची पोत ओरबडून दोन अज्ञात महिलांनी पोबारा केल्याची घटना घडली या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॉमऱ्यात कैद झाल्या आहे याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून एक महिलेला अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुजेटच्या आधार हिरव्या साडीत दिसणाऱ्या या दुसऱ्या महिलेचा लासलगाव पोलीस शोध घेत आहे
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 05, 2025 11:15:27Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_PKG_TULJA
तुळजाभवानीचं शिल्प अष्टभुजाच?
मॉडेल शिल्प बनवण्यासाठी कला संचालनालयाने दिले आदेश.
छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देताना देवीचे शिल्प अष्टभुजा असल्याचे दिले पुरावे.
कला संचलनालय यांच्या आदेशामुळे पुन्हा एकदा पेटला शिल्प अष्टभुजा कि द्विभुजा वाद.
तुळजाभवानी शिल्प वाद!
अँकर
तुळजापुरात उभारण्यात येणाऱ्या 108 फुटी तुळजाभवानी शिल्पावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे... पाहूया यावरचा स्पेशल रिपोर्ट
VO 1
शिल्पातील देवीचं रूप अष्टभुजा असावं की द्विभुजा – यावरून पुन्हा एकदा पुजारी मंडळ, लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्यात मतमतांतरे चिघळली आहेत...
Byte
किशोर गंगणे _माजी अध्यक्ष पुजारी मंडळ
VO:
महाराष्ट्र शासनाच्या 1865 कोटींच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यात 108 फुट उंच शिल्प उभारण्याची घोषणा झाली... छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं हे भव्य शिल्प साकारलं जाणार आहे.
VO 2
या शिल्पासाठी शिल्पकारांकडून तीन फूट उंच फायबर मॉडेल मागवण्यात आले आहेत... विशेष म्हणजे कला संचनालयाने दिलेल्या निर्देशांनुसार देवीचं रूप अष्टभुजा असावं, असं स्पष्ट नमूद केलंय.
“कलासंचालनालयाने शिल्पकारांना दिलेल्या सूचनांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की, देवीच्या तीन ऐतिहासिक संदर्भांमध्येही अष्टभुजाच रूप नमूद आहे. त्यामुळे शिल्प अष्टभुजाच असणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.”
VO:3
मात्र या निर्णयामुळे पुन्हा एकदा जुना वाद तापला आहे... धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी याआधीच अष्टभुजा स्वरूपातील संकल्पचित्रावर आक्षेप घेत, ते संकेतस्थळावरून हटवण्याचे आदेश दिले होते.
सरनाईकांच्या भूमिकेवर आता पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण आता कलासंचालनालयाच्या सूचनांनुसार अष्टभुजा देवीचं मॉडेल मागवण्यात येतंय.
“या सगळ्या गोंधळात अष्टभुजा स्वरूपाच्या समर्थनार्थ एक पुजारी मंडळ उभं राहिलंय, तर दुसऱ्या गटाने अष्टभुजेला विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे कैलास पाटील यांनी अष्टभुजा मूर्तीला विरोध दर्शवला असून स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटीलही नाराज असल्याचं बोललं जातंय.”
VO:2
शिल्पाचं स्वरूप ठरवताना पुजारी, इतिहासतज्ज्ञ, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेण्याचं आरोप सत्ताधाऱ्यांवर होत आहेत.
BYTE आमदार कैलास घाडगे पाटील
Byte
अमर राजे कदम अध्यक्ष पुजारी मंडळ
इतिहासतज्ज्ञ गणेश खरे यांचं लिखाण आणि शिल्प संदर्भ निविदा यामुळे अष्टभुजेला अधिक वजन मिळालं असलं तरी, प्रत्यक्ष निर्णयावर सध्या प्रश्नचिन्ह आहे.
FVO
आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या प्रताप सरनाईक यांच्या पुढील भूमिकेकडे... ते अष्टभुजा शिल्पावर शिक्कामोर्तब करणार की पुन्हा नव्या वादाला तोंड देणार?
ज्ञानेश्वर पतंगे झी 24 तास धाराशिव
0
Report