Back
खरपुडीतील आंतरजातीय विवाहात सैराटसदृश अपहरणाचा धक्का!
HCHEMANT CHAPUDE
Aug 05, 2025 15:04:12
Khed, Maharashtra
Feed 2C
Slug: Khed Kidnap Twist
File:07
Rep: Hemant Chapude(Khed)
“सैराट निघाला गैराट”
SLUG:
सैराट निघाला गैराट… खरपुडीतील आंतरजातीय विवाह प्रकरणात नवीन वळण
ANCHOR:काल पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं खरपुडी गाव संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरलं... कारण होतं – विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांचा आंतरजातीय विवाह. मात्र हा विवाह काहींना मान्य नव्हता… आणि त्यातूनच सुरू झाली एक सैराटसदृश घटना… पण आज या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे…
Vo...खरपुडी गावातील प्राजक्ता आणि विश्वनाथ गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला… पण प्राजक्ताच्या कुटुंबियांचा याला तीव्र विरोध होता.
त्यामुळेच तिच्या आई, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी प्राजक्ताला मारहाण करत जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार घडला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सैराटसारखी कथा खऱ्या आयुष्यात घडल्याचं चित्र निर्माण झालं.
Byte: विश्वनाथ गोसावीचा व्हिडिओ
(व्हिडिओचा छोटा अंश दाखवावा – "माझ्या पत्नीचं अपहरण झालंय... तिला धोका आहे")
Vo...ही घटना गंभीर बनली आणि खेड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला.
संध्याकाळपर्यंत प्राजक्ताच्या वडील, आई आणि भाऊ प्राजक्ताला घेऊन थेट खेड पोलीस ठाण्यात आणत कोर्टात हजर केलं
Byte: अमोल मांडवे, पोलीस उपविभागीय अधिकारी:
Vo...प्राजक्ताने पोलिसांसमोर स्पष्ट भूमिका घेत, "माझ्या आई-वडिलांना आणि पतीला काहीही त्रास होऊ नये," असं सांगितलं. तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
मात्र, दुसरीकडे काशीद कुटुंबियांनी विश्वनाथ गोसावीबद्दल गंभीर आरोप केले आहेत.
"विश्वनाथ याचं आधीचं लग्न झालं आहे, आणि त्यांनी हे लपवलं. तसंच त्यांच्या आश्रमात अंधश्रद्धा पसरवली जात आहे, हे सत्य बाहेर यावं."
या आश्रमात ४० हून अधिक गाड्या, आलिशान खोल्या, आणि मोठी शेती असल्याची माहितीही समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर विश्वनाथ गोसावीचं चारित्र्य, त्याचं पूर्वीचं लग्न, आणि प्राजक्ताशी झालेलं नातं यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Byte: राजाराम काशिद (प्राजक्ताचे वडील)
Byte: वकील निलेश आंधळे (आरोपींच्या वतीने):
End Vo...तर खरपुडीतील सैराटसदृश प्रकरण आता अनेक वळणं घेत आहे...
मुलीच्या जबाबावर, आरोपींच्या चौकशीवर, आणि पोलिसांच्या तपासावर हे प्रकरण अवलंबून राहिलं आहे.
खरंच... सैराट निघाला गैराट...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowAug 06, 2025 02:00:52Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ता जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निर्देशन देण्यात आलेय...मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरून भगवा दहशतवाद या शब्दप्रयोगाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा यावेळी तीव्र शब्दात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आलाय..या दरम्यान हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची आंदोलनात उपस्थिती होती..
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 06, 2025 01:46:59Akola, Maharashtra:
Anchor : पिकअप वॅन आणि दुचाकीच्या धडकेत बापलेकांचा मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर फाट्याजवळ घडलीय...अकोला - मंगरुळपीर रोडवरील पिंजर फाट्याजवळ हा भीषण अपघात घडलाय. भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात वडिल आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय..अपघाताची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले..स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले अडून या घटनेचा पुढील तपास बार्शीटाकळी पोलिस करीत आहेय..
0
Report
CFChandrakant Funde
FollowAug 06, 2025 01:02:16Pune, Maharashtra:
Feed by live
Ganesh miravnuk control pkg
पुण्याच्या गणेशोत्सवात खरंतर विसर्जन मिरवणूक हेच सर्वासाठी खास आकर्षण असतं...पण यंदा त्यावरूनच मानापमान नाट्य बघायला मिळतंय...मानाचे 5 गणपती हे पूर्वापार निश्चित असले तरी यंदा प्रथमच 6 व्या क्रमांकावरून चढाओढ बघायला मिळतेय...पाहुयात झी 24 तासचा हा खास रिपोर्ट...
Play pkg
Last line
Mini montage
पुणे विसर्जन मिरवणुकीची आजची बैठक निष्फळ...
6 व्या क्रमांकांवर यंदा भाऊ रंगारीचा दावा...
तर त्वष्टा कासार मंडळही आपल्या पारंपरिक 7व्या क्रमांकावर ठाम ...
पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच मानापमान नाट्य...!!!
व्हीओ...लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या पुणे सार्वजनिक गणेशोत्सवाला खरंतर शेकडो वर्षांची परंपरा हे...पण कालानुरूप त्यात अनेक बदल होऊन अलिकडच्या काळात गणेश मंडळांकडून दरवर्षी केली आकर्षक आरास आणि 10 व्या दिवशीची विसर्जन मिरवणूक हेच दोन प्रमुख आकर्षणं गणेश भक्तांचे पाय पुण्याकडे खेचतात...गणेश विसर्जन मिरवणुकीत परंपरेनुसार पहिली पाच गणपती मंडळं ही ठरलेली असतात...यंदाही त्याबद्दल कोणाचाच वाद नाही पण 6 व्या क्रमांकावर कोण जाणार हा वाद माञ, यंदा प्रथमच निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय...भाऊ रंगारी ट्रस्टने यंदा 6 व्या क्रमांकावर दावा ठोकलाय...तुम्हीच बघा पुणीत बालन काय म्हणतात ते...
Byte पुणीत बालन, उत्सवप्रमुख, भाऊ रंगारी
व्हीओ...दरम्यान, आजवरच्या परंपरेनुसार 6,7व्या क्रमांकावर जाणाऱ्या त्वष्टा कासार गणेश मंडळाने आपला नियोजित क्रम बदलण्यास ठाम नकार दिलाय..
मानाच्या गणपतीनंतर पालिका कर्मचारी गणपती पाठोपाठ जाणार तर आम्हीच नाहीतर मिरवणुकीतच सहभागी होणार नाही, अशी टोकाची भूमिका मंडळाचे अध्यक्ष छोटू वडके यांनी घेतलीय...
बाईट...छोटू वडके, त्वष्टा कासार गणपती
व्हीओ...दरम्यान तिकडे, दगडूशेठ हा 4 वाजता बेलबाग चौकात येण्याचा गेल्या 2 वर्षांपासूनचा शिरस्ता यावेळी कायम राहणार असल्याचं जाहिर केलंय...त्यामुळे मिरवणुकीत भाऊ रंगारी आणि मंडई आधी की दगडूशेठ आधी सहभागी होणार? हा नवाच पेचप्रसंग निर्माण झालाय...बघुयात आगामी बैठकीत तरी या दोन्ही वादावर काही सर्वमान्य तोडगा निघतो का ते...
चंद्रकांत फुंदे, झी 24 तास पुणे
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 06, 2025 01:02:05Ambernath, Maharashtra:
मंदिरातून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अवघ्या तीन तासातच ठोकल्या बेड्या !
अंबरनाथ पोलिसांच्या गुन्हे पथकाची उल्लेखनीय कामगिरी !
चोरट्यांकडून मुद्देमाल ही केला हस्तगत !
Anchor अंबरनाथ मधील एका मंदिराची दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अंबरनाथ पोलिसांनी अवघ्या तीन तासातच बेड्या ठोकल्या असून त्याच्यजवळून मुद्देमाल ही हस्तगत करण्यात आला आहे. सलमान कासीम शेख असे आरोपीचे नाव असून सहा हजारांची रोख रक्कम आणि दहा हजारांचा मोबाईल असा एकूण सोळा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
Vo अंबरनाथ पश्चिम येथील शिवमार्केट परिसरातील सिद्धी गल्ली नंबर 4 व 5 येथील मा. आंबे आणि बाबारामदेव मंदिर येथे 5 ऑगस्ट रोजी चोरट्याने दानपेटी फोडून चोरी करून लंपास झाला होता. दरम्यान मंदिरात चोरी झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक रुपाराम छगनलाल दर्जी वय 44 यांनी तत्काळ अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. दरम्यान अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून आरोपी सलमान कासीम शेख (वय 25) याला बेड्या ठोकल्या असून त्याच्याजवळून सुमारे सोळा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही उल्लेखनीय कामगिरी अंबरनाथ गुन्हे शाखेच्या शोध पथकाने केली असून हा चोरटा सराईत असून त्याने अनेक चोऱ्या यापूर्वीही केल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 06, 2025 01:01:55Ambernath, Maharashtra:
बदलापूर वालीवली अपघात प्रकरण
ट्रक चालकास अखेर पोलिसांनी केली अटक
अपघातानंतर ट्रक चालक झाला होता फरार
भीषण अपघातात महिलेचा मृत्यू तर चार जण झाले होते गंभीर जखमी
Bdl accident arrest
Anchor बदलापुरात दोन ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास एका भरदाव ट्रकने वालीवली नाक्यावर तीन ते चार वाहनांना धडक दिली होती. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता तर चार जण गंभीरित्या जखमी झाले होते. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता अखेर तीन दिवसांनंतर बदलापूर पोलिसांनी ट्रक चालक सागर निषाद याला अटक केली आहे.वाहतुक विभागाचे निरीक्षक या ट्रॅक्टरची तपासणी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले, तपासणी अहवाल आल्या नंतरच ट्रकचा ब्रेक फेल झाला होता की हा अपघात होण्यास चालकाची चुकी होती हे समजू शकेल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं,
Byte किशोर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 06, 2025 01:00:51Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी इस्लामपुरात मुंडन आंदोलन
अँकर - सांगलीच्या इस्लामपूर मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी मुंडन आंदोलन करण्यात आले आहे.अण्णाभाऊ साठेंचा जन्मगाव वाळवा तालुक्यातील वाटेगाव असून देखील तालुक्याचे मुख्य ठिकाणी असणाऱ्या इस्लामपूर येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे.नुकतीच अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली आहे,त्या निमित्ताने इस्लामपूरच्या तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा देखील बसवण्यात आला आहे,आता त्याच ठिकाणी कायमस्वरूपी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा,या
मागणीसाठी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले आहे.तसेच अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा,अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशारा देण्यात आला आहे.
बाईट - बापूराव बडेकर - आंदोलक -इस्लामपूर.
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 06, 2025 01:00:21Ambernath, Maharashtra:
अंबरनाथचं न्यायालय उद्घाटनासाठी सज्ज!
९ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन
उल्हासनगर, कल्याण, ठाण्याच्या न्यायाधीशांकडून पाहणी
Amb court
Anchor : अंबरनाथमधील नवीन न्यायालयाचं येत्या ९ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांच्या पथकाने नुकतीच न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली.
Vo : या पाहणी दरम्यान न्यायाधीशांनी इमारतीतील विविध दालनांची आणि सुविधांची माहिती घेतली. न्यायालय सुरू झाल्यानंतर उल्हासनगर किंवा कल्याणला न जाता आता अंबरनाथमध्येच न्यायनिवाडा होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा न्यायालय ठाणे, जिल्हा न्यायालय कल्याण आणि उल्हासनगर तालुका वकील संघटना यांचे युद्धपातळीवर काम सुरू असून पोलीस यंत्रणाही जोरदार कामाला लागली आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पोलीस अधिकारी, वकील, विविध विभागाचे अधिकारी यांची न्यायाधीशांनी बैठक घेतली. या बैठकीत उपस्थितांना समस्या, महत्त्वाच्या सूचना, तसेच इमारतीमध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 05, 2025 14:00:38Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - जम्मू-कश्मीर मधील सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी एक हजार तरुण विशेष रेल्वेने रवाना - मंत्री उदय सामंतांनी दाखवला झेंडा.
अँकर - देशाच्या जवानांच्यासाठी जम्मू कश्मीर मध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्स्प्रेस विशेष रेल्वे रवाना झाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते यावेळी विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला.एक हजार तरुण 9 ऑगस्ट रोजी जम्मू कश्मीर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ महाराज शिंदे यांच्या उपस्थितीत
पार पडणाऱ्या सिंदूर महा रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत,यावेळी रक्तदात्यांना उदय सामंत यांनी शुभेच्छा देत,जवानांना रक्तदान करणारे रक्तदाते नसून रक्तवीर असुन यापुढे जवानांना रक्तदान करणाऱ्यांना रक्तवीर म्हणून संबोधले जाईल,असा विश्वास व्यक्त केला.शिवसेना शिंदे गटाचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंदूर रक्तदान शिबिराचा आयोजन थेट जम्मू- काश्मीरमध्ये करण्यात आले आहे.
बाईट - उदय सामंत - उद्योग मंत्री.
बाईट - चंद्रहार पाटील - डबल महाराष्ट्र केसरी
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 05, 2025 14:00:18Vasai-Virar, Maharashtra:
Date-5aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI ST BUS
Feed send by 2c
Type-AV
Slug-- महामार्गावर अर्नाळा- पंढरपूर एसटी बसला अपघात
अँकर - एसटी महामंडळाच्या अर्नाळा -पंढरपूर बसला महामार्गावरील वसईच्या सातिवली खिंडीजवळ अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी बसमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
सकाळच्या वेळेत पंढरपूर-अर्नाळा एसटी बस विरार पश्चिमेच्या अर्नाळा आगरातून पंढरपूरला जाण्यासाठी रवाना झाली होती. यावेळी सातिवली खिंड येथून जात असताना बसला मागून डंपरची धडक दिली. या धडकेमुळे बस समोरच्या डंपरला धडकली त्यामुळे हा अपघात घडला.
यावेळी बसमधून १० प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी दोन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय अर्नाळा आगाराचे पथक ही घटनास्थळी पोहचले.
या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 05, 2025 13:33:30Ambernath, Maharashtra:
वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची दूरवस्था
वांगणीकरांना दररोज
खड्ड्यातून करावा लागतो प्रवास
रस्ता दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष
Vangani road
Anchor - वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची पुरती दुरवस्था झालीय. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहनं चालवणही कठीण होऊन बसलय. मात्र या खड्डेमय रस्त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केलय.
वांगणीत पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा एकमेव रस्ता आहे. मात्र पूर्वेकडील रस्त्यावर रेल्वे फाटकातच खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी बाईकस्वार पडून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केल्याचं दिसून येत नाहीत. भर पावसात या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं असतं. रेल्वे फाटकातील या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनं पूर्व-पश्चिम भागात ये-जा करत असतात. वांगणी पश्चिमेकडे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे रुग्णांना देखील याच रस्त्यावरून जावं लागतं. शिवाय विद्यार्थीही स्कूल व्हॅन मधून याच रस्त्यावरून ये-जा करतात. या सगळ्यांनाच वांगणी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांमधून होतीय.
चंद्रशेखर भुयार , वांगणी
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 05, 2025 12:49:07Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 0508ZT_INDAPURSAND
FILE 2
इंदापूरमधील गंगावळणात अवैध वाळू उपसा उघड, ४८ हजारांचा साठा पोलिसांच्या ताब्यात..
भीमा नदीतून यांत्रिक बोटीने वाळू उपसा एकावर गुन्हा दाखल...
Anchor — इंदापूर तालुक्यातील गंगावळण गावच्या हद्दीत उजनी जलाशयातील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता नंदकुमार गलांडे असं आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून ४८ हजार रुपये किमतीची आठ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.ग्राममहसूल अधिकारी करिष्मा मोहनराव बोबडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. यामध्ये यांत्रिक बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा करून साठवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 05, 2025 12:32:44Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0508ZT_JALNA_MOSAMBI(1 FILE)
जालना : बाजार समितीत 5 दिवसांत 2 हजार 185 क्विंटल मोसंबीची आवक,
अँकर :जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 5 दिवसांत 2 हजार 185 क्विंटल मोसंबीची आवक झालीय.मोसंबीला सरासरी 950 रुपये क्विंटल बाजारभाव मिळालाय.कमी बाजारभाव मिळत असल्यानं मोसंबीची आवक काही प्रमाणात घटली आहे.आणखी काही दिवस मोसंबीची आवक वाढण्याची शक्यता कमी आहे.मोसंबीचे दर घटल्यानं मोसंबी उत्पादक शेतकरी दरात वाढ होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 05, 2025 12:17:20Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0508ZT_JALNA_RATION(4 FILES)
जालना : जिल्ह्यातील 3 लाख 36 रेशन लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी
ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डवरून मिळणारे धान्य बंद होण्याची शक्यता
धान्य मिळणं बंद झाल्यास लाभार्थीच जबाबदार राहतील-जिल्हा पुरवठा अधिकारी
अँकर : जालना जिल्ह्यात रेशनचे 15 लाख 89 हजार 888 लाभार्थी आहेत.यापैकी 9 लाख 24 हजार 255 लाभार्थ्यांनी ई -केवायसी पूर्ण केलं आहे.मात्र उर्वरीत 3 लाख 36 हजार 97 लाभार्थ्यांनी ई -केवायसी केलेलं नाही.त्यामुळे या ई -केवायसी न करणाऱ्यांचं रेशन बंद होण्याची शक्यता आहे.याबाबत पुरवठा विभागाकडून स्पष्ट सूचना किंवा आदेश आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे तातडीने रेशनच्या लाभार्थ्यांनी त्यांचं ई-केवायसी पूर्ण करावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी दिलाय.ई-केवायसी न करणाऱ्यांमध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील लहान मुलं,वयोवृद्ध यांचा समावेश आहे.वयोवृध्दांचे थम न येणं,आधारकार्ड आणि रेशनकार्डमधील नावांमध्ये फरक असणं या कारणांमुळे हे ई-केवायसी पेंडिंग असल्याचं समोर आलं आहे.दरम्यान लाभार्थ्यांनी त्यांचं ई-केवायसी याच महिन्यात पूर्ण करून घेण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलं आहे.ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचं धान्य मिळणं बंद झाल्यास त्याला लाभार्थीच जबाबदार असतील असा ईशाराही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना दिलाय.
बाईट : सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी,जालना
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 05, 2025 12:05:14Bhandara, Maharashtra:
अखेर परिणय फुके यांनी जाहीर माफी मागितली....
Anchor :- 1 ऑगस्टला भंडारा येथे कार्यकर्ता मेळाव्यात परिणय फुके यांनी मीच शिवसेनेचा बाप आहे. अस वक्तव्य केलं होत. त्यावर शिवसेनेच्या वतीने राज्यभर प्रतिक्रिया उमटत होत्या अखेर
भाजपा आमदार परिणय फूके यांनी जाहीर माफी मागितली आहे...
भारतीय जनता पार्टीच्या भंडारा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आहे. वास्तविक मला तसे बोलायचे नव्हते. कुणाला दुखविण्याचा माझा हेतू सुद्धा नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.
परंतु माझ्या विधानामुळे आमच्या मित्र पक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भावना दुखविल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. अस या पत्रात लिहिलं आहे....
0
Report