Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

पुणे पुलिस ने जामिन पर आरोपी से 4 अग्निशस्त्र जब्त किए!

HCHEMANT CHAPUDE
Aug 14, 2025 04:03:36
Shirur, Maharashtra
Feed 2C Slug: Wagholi Unit 6 Police Action File:01 Rep: Hemant Chapude(Wagholi) Anc: गंभीर गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून 4 अग्निशस्त्र आणि 5 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ला यश आले असून आरोपींवरती यापूर्वी पुणे जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया वाघोली पुणे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Aug 14, 2025 05:07:15
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_CYCLE_RALLY तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमली पदार्थ विरोधात अमरावती शहर पोलीस ॲक्शन मोडवर; जनजागृतीसाठी शहरात काढली सायकल रॅली अँकर :– अमली पदार्थ विरोधात अमरावती शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थविरोधात जनजागृती साठी सायकल रॅली काढण्यात आली आहे. सायकल रॅलीमध्ये अमरावती शहरातील पोलिसासह अनेक नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. अमरावतीच्या पोलीस कवायत मैदानावरून या सायकल रॅलीला सुरुवात झाली असून शहराच्या मुख्य चौकातून ही सायकल रॅली जाणार आहे. सायकल रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांनी शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगितले जात आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 14, 2025 05:07:04
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख दहा हजार शेतकऱ्यांनी दोन लाख 58 हजार 460 हेक्टर वरील पिके संरक्षित केली आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी आज पीक विमा काढण्याचा शेवटचा दिवस आहे. यावर्षी शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना बंद झाली आहे, त्याऐवजी पीकनिहाय प्रीमियम करून शेतकऱ्यांना पिक विमा काढावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे फारसा उत्साह दाखवलेला नाही. सोयाबीन करीता 1600 रुपये, कापसासाठी 1800 आणि तुरीसाठी 940 रुपये प्रति हेक्टर प्रीमियम आहे. श्रीकांत राऊत यवतमाळ.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 14, 2025 04:45:51
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 7 FILES SLUG NAME -SAT_VASULI_ISSUE सातारा - साताऱ्यातील वाठार स्टेशन येथे शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यासोबत कर्जदार आणि काही स्थानिकांनी वाद घातला. दीर्घकाळ थकबाकी न फेडल्याने पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी कर्जदाराच्या मालमत्तेची जप्ती करण्यासाठी कारवाई सुरू केली होती. मात्र, कारवाईदरम्यान कर्जदाराने संतप्त होऊन अधिकाऱ्याशी वाद घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कर्जदारांचा बाजूने उभे होते.कर्जदारांनी कर्जाच घेतले नसल्याचे कर्जदारांचे सांगणे आहे.आमच्या कागदपत्रांचा वापर करून बँकेचा कर्मचाऱ्यांनी पैसे लाटल्याला आरोप कर्जदारांनी केला आहे. byte - अनिल पवार स्वाभिमानी शेतकरी संघटना byte - कर्जदार
0
comment0
Report
SKShubham Koli
Aug 14, 2025 04:32:22
Thane, Maharashtra:
कळवा, या ठिकाणी चंद्रभागा पार्क या इमारतीच्या तळमजल्यावरती असलेल्या पारसिक कॅफे मध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. यासीन तडवी सो. अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी श्री. मुंडे सो., कळवा पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह,०१-रेस्क्यू वाहनासह, ०१- वॉटर टँकर वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०२- पीकअप वाहनासह, टोरंट विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. सुरक्षेतेच्या कारणास्तव चंद्रभागा पार्क बी विंग (तळ +६ मजली इमारत) या इमारतीमधील सर्व रहिवाशांना अग्निशन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. सदर आग लागलेल्याने पारसिक कॅफे मधील सर्व साहित्य (टेबल, खुर्ची, शेगडी, फ्रीज, कपाट, व इतर किचन साहित्य) जळाल्याने नुकसान झाले आहे. सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने वाजवली आहे...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Aug 14, 2025 04:18:53
Pune, Maharashtra:
pimpri bicycle kailas puri pune 14-8-25 feed by 2c Anchor - .... पिंपरी चिंचवड शहराची लवकरच सायकलींचे शहर अशी ओळख निर्माण होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी सायकल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांनी जवळच्या कामासाठी सायकलचा वापर करावा अशी अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील पिंपळे सौदागर मध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून 300 सायकल यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही सुविधा 15 ऑगस्ट अर्थात उद्यापासून सुरू होणार असून याच सुविधे संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....! kailas wkt+ vis
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 04:18:44
Nashik, Maharashtra:
nsk_makapa feed by 2C anchor अमेरिकेने भारतावर 50% कर लागल्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टी पक्ष रस्त्यावर उतरला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जाळत नाशिकमध्ये पक्षाने या करवाडीचा निषेध केला जागतिक देशांमध्ये अमेरिका मनमानी करत असल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर महागाईचा स्वरूपात होऊ शकतो तसेच हुकूमशाहीला यामुळे चालना मिळू शकते म्हणून कम्युनिस्ट पक्षाने आपले कार्यकर्त्यांसह निषेधारच्या घोषणाही दिल्या
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 04:15:11
Nashik, Maharashtra:
Nsk_sinner Feed by 2C Anchor सिन्नर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसापासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येत आहे बुधवारी झालेल्या मोहिमेत शंभरहून अधिक अतिक्रमणे यामध्ये हटवण्यात आली आहे शहरातले अनेक रस्ते रुंदीकरण करण्यासाठी पहिल्यांदाच व्यापक स्वरूपात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आहे. आज सदरवाडी रस्त्याची मोजणी होणार असून सर्वसामान्यांकडून या मोहिमेचं स्वागत करण्यात आला आहे
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Aug 14, 2025 03:46:30
Pune, Maharashtra:
pimpri murder kailas puri Pune 14-8-25 feed by 2c पिंपरी चिंचवड Anchor - पिंपरी चिंचवडमध्ये तरुणी आणि तरुणाने एकाची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. मयत तरुण वारंवार तरुणीला त्रास द्यायचा. यातून ही घटना घडल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे. आरोपी तरुणी आणि तरुण हे जिम ट्रेनर असून मयत तरुणाची जिममध्येचं त्यांच्याशी ओळख झाली होती. यश पाटोळे आणि प्रांजल तावरे असं आरोपी जिम ट्रेनरची नावं असून या दोघांचं पार्टनरशिपमध्ये प्रोटीन पझल शॉप आहे. याचं शॉपमध्ये आज दुपारी गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे हा आला. त्याने प्रांजलला शिवीगाळ केली. वारंवार होणारी शिवीगाळ आणि पैशांची मागणी, या त्रासाला प्रांजल कंटाळली होती. आज दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा तोच प्रकार घडला, त्यावेळी प्रांजल ने गोपीनाथच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिने आणि यशने मिळून लोखंडी रॉड आणि पहारने मारहाण केली. यात गोपीनाथ गंभीर जखमी झाला. त्यानंतर जखमी गोपीनाथला रुग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. मग प्रांजल आणि यश दिघी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले अन घडला प्रकार पोलिसांना सांगितला. प्रांजल आणि यश ज्या जिमचे ट्रेनर आहेत, त्याच जिममध्ये गोपीनाथ जिमला येत होता. तिथंच यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली. मात्र गोपीनाथ प्रांजलकडे पैशांची मागणी का करत होता? तो तिला शिवीगाळ करुन का त्रास देत होता? हे मात्र अद्याप ही अस्पष्ट आहे. आता पोलीस तपासात प्रांजल आणि यशकडून या बाबी समोर येतील. बाईट : बापू बांगर - डीसीपी, पिंपरी चिंचवड
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 03:45:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn river crossing issue Feed attached ग्रामीण भागांमध्ये  अनेक ठिकाणी अजूनही  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळत. छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी गावात देखील नागरिकांची अशीच दैना आहे, एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी नदीवर पूल नाही, अगदी कमी असलेलं अंतर कापण्यासाठी दहा किलोमीटरचा वेढा घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना जीवमुठीत घेऊन शाळेत जाण्यासाठी धर्माकोल वर बसून प्रवास करावा लागतोय.  गिरिजा नदी पात्राच्या दोन्ही बाजूला वस्त्या असल्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणी येतात. नदीवर पुल नसल्याने प्रवास करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे,  पाल गाव  मार्गे जाण्याचा रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे पाण्यातून जावे लागते, आता पर्यंत तीन जणांचा मृत्यू पाण्यात पडल्याने झाला असल्याने आता थर्माकोलचा वापर करून प्रवास करत असल्याचं गावकरी  सांगताय.. Byte गावकरी
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 14, 2025 03:34:46
Pandharpur, Maharashtra:
14082025 Slug - PPR_BIKE_MOBILE_CRIME file 01 ----- Anchor - करमाळा पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी विविध तीन गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या वस्तूंचा जलद गतीने शोध लावलेला आहे. वेगवगेळ्या ठिकाणी दोन मोटरसायकल आणि एक मोबाईल चोरीला गेला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पोलिसांना या चोरट्यांपर्यंत जाण्यात यश मिळाले आहे. सोबतच त्यांनी चोरी केलेल्या दोन मोटरसायकल आणि एक मोबाईल सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 14, 2025 03:31:56
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात भीषण अपघात झाला. धडगाव तालुक्यातील बिलगाव -गेंदा रस्त्यावर मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल थेट पुलाखाली जाऊन पडली. मोटरसायकली सकट दोघे तरुण थेट बारा फूट पुलावरून थेट खाली पडले. मोटरसायकल पुलाखाली कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याचे प्रकृती चिंताजनक आहे. बिलगाव ते गेंदा रस्ता दरम्यान भरधाव मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात गंभीरित्या जखमी झालेल्या तरुणाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना केले असून, धडगाव ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. सापड डोंगर रांगांमध्ये मुलांना सुरक्षित कठडे लावण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 14, 2025 03:31:28
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_THILORI_RAIN पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 संततधार पावसाचा दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावाला फटका; संपूर्ण गाव पाण्याखाली, शेती पिकांचे नुकसान, लेंडी नाल्याला पूर अँकर :– अमरावती जिल्ह्यात काल सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र या पावसाचा फटका दर्यापूर तालुक्यातील थिलोरी लखापूर गावला बसला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. गावात सर्वत्र पाणीच पाणी शिरले असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. गावात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान थिलोरी गावातील लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नाल्याच्या काठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र गावात प्रशासनाचा एकही अधिकारी कर्मचारी हजर नसल्याने गावकरी संताप व्यक्त करत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 03:17:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn ladki bahin av Collected officer feed attached राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील सुमारे २६ लाख संशयित लाभार्थीच्या गृह चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये संभाजी नगर  जिल्ह्यातील १ लाख ४ हजार अर्जाची फिजिकल पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ८४ हजार अर्ज हे एकाच घरातील तीन किंवा अधिक महिलांचे असल्याचे तपासणीत समोर आली आहे, तर २० हजार अर्ज २१ वर्षांखालील किंवा ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थीचे आहेत. या सर्व अर्जदारांचा लाभ शासनाकडून थांबवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात १०,१५,८३४ अर्ज आले होते त्यापैकी ९,२४,३४८ अर्ज मंजूर झाले.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Aug 14, 2025 03:17:48
Pune, Maharashtra:
pimpri palika kailas puri Pune 14-8-25 feed by 2c Anchor - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमुळे इमारत उजळून निघाली असून संपूर्ण परिसर या आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईमुळे तिरंगा मय झाला आहे. याच विद्युत रोषणाईची ही खास झलक...!
0
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top