Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

मेघना बोर्डीकरची रोहित पवारांवर तिखट टीका, नेत्यांचा हस्तक्षेप चर्चेत!

KJKunal Jamdade
Aug 04, 2025 11:35:43
Shirdi, Maharashtra
Sangmner News Flash *मंत्री मेघना बोर्डीकर बाईट ऑन ग्रामसेवक आणि रोहित पवार -* *ग्रामसेवकाबद्दल महिलांच्या तक्रारी होत्या...* माझ्याजागी कुणीही असते तरी त्याच भावना असत्या... मी घडलेल्या प्रकाराबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली... सर्वच ग्रामसेवक तसे नाहीत... गावात एखाद्या नेत्याचा किती हस्तक्षेप असावा हे लोकांनी ठरवले पाहिजे... सरकारच्या योजना लोकांसाठी असतात... *मात्र खऱ्या गरजूंना योजना मिळत नसेल तर त्रागा होणारच...* रोहित पवार अर्धवट माहिती पसरवतात... *रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाली आहे...* *आमच्या मतदारसंघातले रोहित पवारांचे जुने मित्र अजितदादांकडे आलेत...* *त्यांनीच हा कार्यक्रम केलाय...* *त्यांनीच रोहित पवारांना अर्धवट माहिती पोहचवली...* रोहित पवारांना काही काम नसल्याने अर्धवट माहितीच्या आधारे दुसऱ्यांना दोष देताय... *मेघना बोर्डीकर यांचा रोख अजित पवार गटाचे नेते विजय भांबळे यांच्याकडे?...* विजय भांबळे यांनीच रोहित पवारांना दिला मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ?... bite - मेघना बोर्डीकर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Aug 04, 2025 14:01:07
Pandharpur, Maharashtra:
04082025 Slug - PPR_JANKAR_KARNA file 01 ----- Anchor - अनेक राज्यकर्ते अनेक मुख्यमंत्री पाहिले पण कर्णा सारखा दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे उप मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे आहेत. शरद पवारांच्या आमदाराची स्तुती सुमने माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाजाच्या मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उप मुख्यमंत्री शिंदेंची थेट महाभारतातील कर्णाशी तुलना केली आहे. मी चाळीस वर्षाच्या एकनाथ शिंदे यांच्या सारखा माणूस पाहिला नाही.राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या सारखा माणूस होईल का नाही माहीत नाही. मी 20 वर्ष निवडणुका लढवत आहे. पण असा दानशूर माणूस पाहायला मिळाला नाही. संजय शिरसाट आणि भरत गोगावले त्यांचे संताजी धनाजी आहेत असेही आमदार जानकर म्हणाले ---- साउंड बाईट - आमदार उत्तम जानकर
0
Report
JMJAVED MULANI
Aug 04, 2025 13:46:20
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0408ZT_INDAPURTEMPLE FILE 5 निमगाव केतकीच्या ग्रामदैवत श्री केतकेश्वर मंदिरात बेल फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई.. Anchor: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे ग्रामदैवत श्री केतकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आकर्षक बेल फुलांची आरास करण्यात आली असून सर्वांचे लक्ष वेधणारी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे..मंदिरात रात्री उशिरापर्यंत गावासह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. केतकेश्वर मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील समस्त गावकरी मंडळींच्या वतीने शंभू महादेवाच्या गाभाऱ्यात तसेच मंदिर परिसरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. पिंडी वरती बेलफुलांची सुंदर सजावट करण्यात आलीय... सोमवारी पहाटेपासूनच मंदिरामध्ये विविध अभिषेक घालण्यात येत होते. गावात सह परिसरातील अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी व ही आरास पाहण्यासाठी गर्दी केली होती...
0
Report
SGSagar Gaikwad
Aug 04, 2025 13:19:29
Nashik, Maharashtra:
Feed send by mozo Reporter-sagar gaikwad Slug-nsk_bhide_prg नाशिक - - नाशिक मध्ये शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन - व्याख्यानाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात - सकाळी संभाजी ब्रिगेडने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त - संत तुकारामांचं पुस्तक देऊन आंदोलनाचा दिला होता इशारा - यानंतर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठेवले होते नजर कैदेत - व्याख्यानाच्या ठिकाणी माध्यमांनाही प्रवेश नाही
0
Report
ABATISH BHOIR
Aug 04, 2025 13:03:52
Kalyan, Maharashtra:
कल्याण कोर्टाचा मोठा निर्णय: 18 वर्षांनंतर निकाल.. राष्ट्रवादी शरद पवार कटाच्या नेत्यांच्या मुलाच्या हत्ये प्रकरणी 3 दोषी तर शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील सह 10 जण निर्दोष २००७ मध्ये कल्याण पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या हत्येप्रकरणी 18 वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.​२३ मार्च २००६ रोजी गोलवली येथे होळीच्या कार्यक्रमात बाळा भोईर यांची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी १० एप्रिल २००७ रोजी विजय पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गेल्या १८ वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. याप्रकरणी न्यायालयाने विजय बाबुराव वाकडे, साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना दोषी ठरवले आहे. त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, ७ ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाईल.या प्रकरणात ज्या दहा जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यात शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांचाही समावेश आहे. आरोपींचे वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितले की, ज्यावेळी विजय पाटील यांची हत्या झाली, तेव्हा महेश पाटील सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कल्याण न्यायालयात हजर होते, याचे पुरावे आम्ही सादर केले. त्यामुळे त्यांची निर्दोष सुटका झाली.​या प्रकरणातील तपास अधिकारी यांचे निधन झाले असून, मृत व्यक्तीच्या शरीरातून गोळी आढळली नाही, असेही वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने नेमक्या कोणत्या कलमांखाली तिघांना दोषी ठरवले आहे, हे ७ ऑगस्ट रोजी शिक्षेच्या सुनावणीवेळी स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले आहे. सध्या न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण असून, सर्वांचे लक्ष ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागले आहे. byte... हरी सरोदे वकील
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 04, 2025 12:34:29
Hingoli, Maharashtra:
अँकर- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कावड यात्रे निमित्ताने हिंगोली येथे येणार आहेत,उपमुख्यमंत्री शिंदे कावड यात्रेला संबोधित करणार होते. पण उपमुख्यमंत्र्याच्या सभेवर पावसाच सावट घोंगावतेय. हिंगोली शहरातील गांधी चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे,नेतेमंडळींना बसण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले असून भाविकांसाठी मात्र मोकळे मैदान आहे,पण अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू झाला असून सभास्थळी पावसाचे पाणी साचलय,पावसाचा जोर ही कायम असल्याने उपमुख्यमंत्री यांच्या सभेचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जातोय...
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 04, 2025 12:20:05
Ambernath, Maharashtra:
बदलापुरातून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय बदलापूर शहरातून उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. बंदी घातलेल्या सिमी या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव ओसामा शेख असे असून तो बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. एटीएसने ओसामा शेखला ताब्यात घेतल्यानंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात कस्टडीसाठी हजर केले. असामी शेख याला उत्तर प्रदेश एटीएस अधिक तपासासाठी उत्तर प्रदेश येथे घेऊन गेली आहे
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 04, 2025 12:19:45
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढली जाते. कळमनुरी चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधु अमृतधारा मंदिर अशी ही कावडयात्रा काढली जाते. चिंचाळेश्वर मंदिरात महादेवाची आरती करून या यात्रेला सुरुवात झाली होती,18 किलोमीटर ची पाई यात्रा करीत ही यात्रा हिंगोलीत पोहोचत असते. मागील तीन वर्षांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कावड यात्रेला येतात, सदर कावड यात्रा हिंगोली शहरात दाखल झाली असून थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कावड यात्रेत सहभागी होणार आहेत. हिंगोली शहरातील गांधी चौकात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
0
Report
JMJAVED MULANI
Aug 04, 2025 12:18:46
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0408ZT_BARAMATIKHATIK BYTE 1 अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची खाटीक समाजाची मागणी; खाटीक समाजाबद्दल वक्तव्यानंतर संताप.. Anchor : आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर टिका करताना खाटीक समाजाबद्द्ल चुकीचे वक्तव्य केलं.. या पार्श्वभूमीवर हिंदू खाटीक समाज संघटनेचे कार्याध्यक्ष करण इंगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यासह उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदन देत खोतकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बाईट. करण इंगुले
0
Report
SKSACHIN KASABE
Aug 04, 2025 12:18:14
Pandharpur, Maharashtra:
04082025 Slug - PPR_GOGVALE_BYTE file 01 ---- Anchor - रायगड जिल्ह्यातील बार साठी करमणूक म्हणून परवानगी आहे. तिथे काही हिडीस फिडीस दाखवले जात नाही. जर काही डिफी कल्टी असेल तर तसे बार बंद करू असे वक्तव्य रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे गैर वर्तन आणि चुकीचे बार असतील तर ते भाग वेगळा आहे. सगळीकडेच बार आहेत. तिथे खाणे पिणे चालते. त्यात काय डिफी कल्टी असेल तर शासन त्यावर बंदी आणेल. या पूर्वी अशा बार वर बंदी आणली आहे. पंढरपूर मध्ये शिवसेना पक्षात दोन गटात काय राडा झाला याबाबत माहिती घेऊ , पण जो काम करेल तो पुढे जाईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाद करण्यापेक्षा पक्षाचे काम करावे असा सल्ला दिला आहे --- Byte - भरत गोगावले, मंत्री रोहयो
0
Report
JMJAVED MULANI
Aug 04, 2025 12:03:45
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0408ZT_INDAPURGOGWLE BYTE 1 भरत गोगावले *ऑन_ कचरवाडी* बरळ शेतकरी बरं यांच्या शेतीची आयकीव माहिती होती प्रत्यक्षात पाहणीसाठी इथं आलो आहे.चांगली मेहनत घेतली चांगला विचार असला तर प्रगतशील शेतकरी कसा होऊ शकतो ते या बरळ कुटुंबाकडून मला कळाले.. बरळ यांच्याकडे 18 गुंठे शेतीची त्यांनी कष्टाने 18 एकर केली त्यामध्ये त्यांनी विविध फळबाग लागवड केली आहे.. शेतकऱ्याची संवाद साधला असता त्यांनी माझ्याकडील खात्याकडे काही मागण्या केल्या आहेत त्याची नोंद केली आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी आणि आम्ही याच्यावरती विचार विनिमय करू..... *ऑन_रायगड राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश...* आम्हीपण मुंबईमध्ये धमाका उडवला आहे... तीन गावातील पक्षप्रवेश आम्ही पण घेतले आहेत. राजकारणात सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल ते सांगता येत नाही.... आज रायगड जिल्ह्यात सात आमदार आहेत त्यापैकी त्यांचा एक आहे तीन आमचे भाजपाचे तीन आहेत... **शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोरगरिबांची विचारपूस करणे हे फक्त आम्ही करतो.** *ऑन_ शेततळी कागद अनुदान**. या प्रश्नासंदर्भात पूर्तता केली जाईल. **ऑन _धनंजय मुंडे बंगला ४२ लाख रुपये दंड** **त्याबाबतीत न शिरलेलं बरं...** आज आपण चांगल्या कामासाठी आलो आहोत शेतकऱ्यांच्या हिताचं जे काय असेल ते सांगा मागा ते देण्याचा प्रयत्न करतो. **बीडचं राजकारण कसं काय तापल आहे आणि काही हे तुम्हाला माहिती आहेच त्यामुळे बीडमध्ये सध्या तरी विचार नको.** *ऑन _राजीव साबळे राष्ट्रवादी प्रवेश शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न?** काही लोकांचा वैयक्तिक स्वार्थ असतो.. ते देऊन पूर्ण झाल्यानंतर एका माणसाला किती द्यायचं काय द्यायचं याचं प्रमाण असतं... एखाद्याची भूक भागत नसेल तर त्याला तुमचा आमचा काय पर्याय नसतो ते ज्या घरी गेले त्या ठिकाणी ते सुखी राहू द्यात आमचे काही म्हणणे नाही... *एक राजू गेला तर आमच्याकडे अनेक राजू आहेत आम्ही काम करतो मेहनत करतो जोपर्यंत आमचे एकनाथ शिंदे आमच्या पाठीमागे आहेत तोपर्यंत आम्ही घाबरत नाही.* *ऑन _आमदार परिणय फुके* आमच्यात दोन शिवसेना आहेत ते कोणत्या शिवसेनेबद्दल बोलले माहित नाही. त्यामुळे त्याला विचारणे गरजेचे आहे कुठल्या नेमका शिवसेना तुम्ही बाप आहात. ? *ऑन_कृषी मंत्रालय..* कृषिमंत्री त्यांच्या खात्याचे काम करतील आम्ही आमच्या खात्याचे काम करू. .. *घडामोडी झाल्या त्या झाल्या काही चुकीच्या पण आहेत. नाही म्हणता येत नाही. पण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे,आमच्या पक्षाचा प्रश्न नाही.* त्यामुळे आमचे तीनही नेते मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री त्यावर विचार करतील. *ऑन _ माणिकराव कोकाटे* सगळेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे होऊ शकत नाहीत. त्याप्रमाणे प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे त्यांची विचारसरणी वेगळी असू शकते. आमची वेगळी ... आम्ही सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जनतेने चार वेळा निवडून दिले. ग्रामपंचायत सरपंच पदापासून ते मंत्री पदापर्यंत आलो आहे. शून्यातून गरिबीतून इथपर्यंत आलो आहे. *नेहमी लोकांना सांगत असतो गरिबी आली तर लाजायला नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही... या युक्तीप्रमाणे चालायचं माणूस कितीही मोठा झाला तर त्यांने जमिनीवरून चालायचं हवेत कोण चालतं का ? नाहीतर त्याचा जय महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही.* *ऑन _ गोठ्या गीते* त्याने जे काल केला आहे ते चुकीच आहे. म्हणून मगाशी सांगितले बीडचा नामोल्लेख न करण बरे आहे.. हे सर्व बीडमध्येच जास्त घडलंय घडतय चाललय जो कोणी असे काही करेल त्याचे तो पतन भोगेल... *ऑन_ रायगड पालकमंत्री* मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील तो योग्य असेल असं मला वाटतं. . *ऑन _अमित ठाकरे* मुलगी ही कोणाची बहीण पत्नी आई असते या सर्वांचा विचार करत असताना मुलींवरती हात टाकणं चुकीच आहे परंतु त्याला कायदा सुव्यवस्था सर्व बाबी आहेत.. एकदम टोकाला जाता येत नाही.. अमित ठाकरेंनी केलेले वक्तव्य त्यांच्याप्रमाणे आहे. आम्हाला काही तस वक्तव्य करता येणार नाही... *ऑन _शिवसेना विस्तार* शिवसेना विस्ताराबाबत आमच्यापर्यंत काही आलेलं नाही बैठकीमध्ये ते ठरल आमचे नेते एकनाथ शिंदे देतील तो शिर सावंद्य मानून काम करू... *ऑन _ संजय राऊत* सप्टेंबर महिन्यात राजकीय भूकंप होईल असे ते गेले तीन वर्ष म्हणत आहेत. तीन वर्ष सकाळी उठल्यापासून तेच बोलत आहेत उद्या बघा काय होतंय.. परवा बघा काय होतंय.. अस ते नेहमी म्हणतात... आपण किती लक्ष द्यावं...
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 04, 2025 11:49:44
Virar, Maharashtra:
Date-4aug2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR CCTV Feed send by 2c Type-AV Slug- विरार मध्ये एटीएम मधून पैसे चोरणारी टोळी सक्रिय चोरीची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद वसई विरार मध्ये चिमटा गँग सक्रीय नागिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज अँकर - विरारच्या कारगील नगरातील हिताची कंपनीच्या एटीएम मधून पैसे चोरी करणारी चिमटा गँगची टोळी सुरक्षा रक्षाच्या सतर्कतेमुळे हाती लागली आहे. या दोन्ही चोरट्यांना परिसरातील नागरिकांनी बेदम चोप देऊन विरार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सोनू सूरजप्रसाद गौतम ( 28 ) रणजीतकुमार गोविंदप्रसाद पासी ( 22 ) असे या दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. या एटीएम मध्ये चोरी करतानाच सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. चोरटे एटीएम मशीन मधून पैसे येण्याच्या ठिकाणी चिमटा लावून ठेवत असत जेणेकरून दुसऱ्या ग्राहकांनी काढलेले पैसे त्या चिमट्यामध्ये अडकले जायचे आणि ते पैसे हे चोरटे घेत असत. हा प्रकार सीसीटीव्ही तपासणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर उघडकीस आला आहे. या चोरट्यांच्या विरोधात विरार पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करून अटक केली आहे या दोघांनी आणखी कुठे कुठे चोरी केले आहेत त्याचा तपास पोलीस घेत आहेत...
0
Report
AKAMAR KANE
Aug 04, 2025 11:31:15
kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे (assingment ला पाठवला आहे) ------ नागपूर बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री. On सुप्रीम कोर्ट - सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो.... जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालासाठी थांबल्या होत्या..या निवडणुका होणार आहे,.... ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण राहणार आहे. जे लोक याविरुद्ध गेले त्यांना चपराक बसणार आहे. ओबीसीचा आरक्षणाचा मिळणार आहे ते बदलता येणार नाही. लवकरात लवकर निवडणुका व्हावा जेणेकरून महाराष्ट्राचा ढाच्या मजबूत करण्यासाठी निवडणुका झाल्या पाहिजे. - आयोगाचे काम सुरू झालेल आहे...त्यामुळे निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे. निवडणुका होऊ नये यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले होते. अनेकांनी खोडा आणण्याचा प्रयत्न केला... पण सरकारने योग्य पद्धतीची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. त्यानंतर ओबीसी समाजाला न्याय दिला - प्रभाग रचना झालेल्या ऑब्जेक्शन सजेशन झालेले आहे..लवकरच राज्य सरकार केव्हाही निवडणुका घेतल्या तरी राज्य सरकार तयार आहे. भाजपही निवडणुकीसाठी तयार आहे. - जोपर्यंत लोक प्रतिनिधी निवडून येत नाही. तोपर्यंत जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत जात नाही. लोकप्रतिनिधी असलेल्या प्रशासन योग्य काम करू शकत नाही....तेरा हजाराच्यावर लोकप्रतिनिधी मिळतील...आणि विकासाला मोठी मदत जनतेला मिळणार आहे.
0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 04, 2025 11:00:55
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ च्या पुसद तालुक्यातील मारवाडीखुर्द येथील हनुमान मंदिरातल्या 'नंदी'ला गावाकऱ्यांनी शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. अनेक वर्षांपासून मंदिराला हा 'नंदी' सोडण्यात आला होता. त्यामुळे नंदीने गावकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवले होते. लाडक्या 'नंदी'ने प्राण त्यागल्यानंतर गावकऱ्यांनी या 'नंदी'ची गावातून अंत्ययात्रा काढत त्याला साश्रु नयनांनी भावनिक निरोप दिला.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 04, 2025 10:45:37
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0408_BHA_MAHAYUTI_PKG FILE - 8 VIDEO भंडारा जिल्ह्यात भाजपा शिवसेना वाद शिगेला.... नरेंद्र भोंडेकर व परिणय फूके यांच्यात दुरावा... शिवसेनेचा बाप मीच अस फुकेच वक्तव्य.... फुकेणी जाहीर माफी मागावी शिवसेनेची भूमिका.... Anchor :- भाजप आमदार परिणय फुके यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचा बाप मीच,.. असे वादग्रस्त वक्तव्य केले. आता हा वक्तव्य चांगलाच शिगेला गेला असून राज्यात महायुती मध्ये आता वाद पेटला आहेः.... Vo :- *शिवसेनेचा बाप मीच आहे*..... आमदार परिणय फूके यांच्या वक्तव्याने राज्यात महायुतीमध्ये मोठा वाद पेटला आहे.... भंडारा जिल्ह्यात परिणय फुके व आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाद काही नवीन नाही.... 2019 च्या विधान सभा निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष मैदान होते. भाजपा वतीने अरविंद भालाधरे यांना मैदान उतरवल होत. यात नरेंद्र भोंडेकर यांचा विजय झाला. पुन्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती मध्ये भंडारा विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला गेली. यात शिवसेनेकडून नरेंद्र भोंडेकर हे मैदानात होते. पण परिणय फुके यांना भोंडेकर नको होते. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा विरोध म्हणून फुकेंनी भंडारा विधानसभेची जागा भाजपला द्यावी असा अठ्ठहास केला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील नरेंद्र भोंडेकर असल्यामुळे. इथेही फुके यांची चालली नाही... अशा चर्चा रंगल्या होत्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांना भाजपाचा लोकांनी सहकार्य दिलं पण शेवटी निवडणूक जवळ येताच शिवसेनेच्या दबावानंतर परत भाजपाने महायुतीच्या उमेदवाराला मदत केली... त्यानंतर जून 2025 ला जिल्हा सहकारी दूध संघाची संचालक मंडळाची निवडणूक झाली व त्यात शिंदे सेनेचे आमदार भोंडेकर यांनी नवीन समीकर तयार करत काँग्रेस सोबत ही निवडणूक लढविली यातून पुन्हा नवीन वादाला सुरुवात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भोंडेकर व फुके हे एकत्र निवडणूक लढविताना दिसले..... मात्र निकाल पुढे येताच शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी पत्रकार परिषद घेत कुणाचेही नाव न घेता महायुतीत आमचा गळा कापला गेला असा आरोप लावला होता.... BYTE :- संजय कुंभलकर, VO :- 1 ऑगस्टला महसूल दिनाचे निमित्त साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भंडारा दौरा कार्यक्रमात परिणय फुके म्हणाले, माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण त्या दिवशी मला हे माहीत झाले की, कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे, असे वादग्रस्त विधान परिणय फुके यांनी केले आहे. BYTE :- परिणय फूके, Vo :- तर परिणय फुके यांनी हे एका व्यक्तीवर टीका केली नाही तर पक्षावर केली आहे.... परिणय फुके परिपक्व नाही त्याच हे वक्तव्य पोरकट आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं वक्तव्य स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलं आहे.... BYTE - नरेंद्र भोंडेकर, 121 VO :- महायुतीतील या दोन्ही पक्षाचे अंतर्गत वाढ हे मागील काही वर्षांपासूनच सुरू होते..... मात्र आता सहकार क्षेत्रातील निवडणुका व यांचे आलेले निकाल यामुळे आता हे वाढ चव्हाट्यावर आल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या वादाची ठिणगी पडणार आहे.... त्यामुळे भंडारा विधानसभा मतदार संघात भाजपा विरूद्ध शिवसेना असा संघर्ष पहायला मिळणार आहे...
0
Report
Advertisement
Back to top