Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

लेंडी धरणग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केले, शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप नाकारल्या!

SMSATISH MOHITE
Aug 06, 2025 04:00:40
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Dam Feed on - 2C --------------------------- Anchor - नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणग्रस्तानी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या 40 वर्षांपासून रखडलेल्या या धरणाच्या गळ भरणीला सुरुवात झाली आहे. पण बाधित शेतकऱयांना विश्वासात न घेता गळभरणी ला सुरुवात केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र आणि तेलंगनाला या धरणाचा फायदा होणार आहे. पण कमी मावेजा दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूनर्वसनातील कामे आणि इतर मागण्या पूर्ण झाल्यानंतर गळभरणी करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तंची आहे. ------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Aug 06, 2025 09:36:12
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0608ZT_JALNA_FUND_FRAUD(10 FILES) जालना : जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या बदलीनंतर अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची चौकशी थंडावली स्वाभिमानी शेतकरी संघटना घेणार छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव विधिमंडळात मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन मात्र अजूनही दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे सरकारकडून आदेश नाहीत,प्रशासनातील खात्रीलायक सूत्रांची माहिती अँकर : जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदानाचा तपास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या बदलीनंतर थंडावला आहे.2024 साली जालन्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपिटीच्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारकडुन कोट्यावधी रुपयांचं अनुदान देण्यात आलं होतं.मात्र अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याचं कागदोपत्री दाखवून तलाठी,मंडळाधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी बोगस खात्यांवर हे अनुदान वळवून हडपल्याचं चौकशी समितीच्या चौकशीत समोर आलंय.या प्रकरणी 21 जणांना निलंबित करण्यात आलं असून 76 तलाठी,मंडळाधिकारी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलीय.मात्र जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाणे येथे बदली झाल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी थंडावली आहे.दरम्यान या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन विधिमंडळात मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी दिलं होतं.मात्र अजूनही प्रशासनाला या दोषींवर गुन्हे दाखल करण्याबाबतचे आदेश मिळाले नसल्याची माहिती प्रशासनातील सुत्रांनी दिलीय. दरम्यान,अतिवृष्टी अनुदान घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.त्यांनी हडपलेली रक्कम वसूल करण्यात यावी.या सर्व दोषींना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडीपीठात धाव घेणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी म्हटलं आहे. बाईट : सुरेश काळे,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,जालना
0
Report
MAMILIND ANDE
Aug 06, 2025 09:35:50
Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग* SLUG- 0608_WARDHA_JNV_SUCIDE - वर्ध्यात जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षकाची आत्महत्या - वर्ध्याच्या सेलूकाटे येथील धक्कादायक प्रकार - संजय पंडितराव देवगडे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव - आपल्या राहत्या क्वाटर मध्ये आत्महत्या केल्याची माहिती - जवाहर नवोदय विद्यालयात पाचवी आणि सहावी वर्गात मराठी शिकवित असल्याची माहिती अँकर - वर्धा जिल्ह्यातील सेलूकाटे येथील जवाहर नवोदय विद्यालयात आज एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे..या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक संजय पंडितराव देवगडे यांनी आपल्या राहत्या क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे..संजय देवगडे हे शाळेत पाचवी आणि सहावी वर्गाला मराठी विषय शिकवत होते. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहेय.. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. विद्यालय प्रशासन आणि शिक्षक वर्गातही शोककळा पसरली आहेय..शिक्षक देवगडे हे शांत,विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून तपास सुरु असून आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
0
Report
SMSarfaraj Musa
Aug 06, 2025 09:20:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चिनी बेदाण्या विरोधात सांगलीत द्राक्ष उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. अँकर - चिनी बेदाण्यावर बंदी आणावी यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आज शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगलीमध्ये धडक मोर्चा काढला.कर चुकवून देशामध्ये येणाऱ्या चिनी बेदाण्याची चोरटी वाहतूक रोखावी तसेच बाजारात विक्री केला जाणारया बेदाण्यावर देखील बंदी आणावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. बेदाणा तस्करी करून विकल्या जाणाऱ्या चिनी बेदाण्याची 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात येते आहे.त्यामुळे पाचशे ते सहाशे रुपये असणाऱ्या भारतीय बेदाण्याच्या विक्रीला मोठा फटका बसत असून दर देखील 70 ते 80 रुपये इतके कमी झाले आहेत.त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसत असल्याचा आरोप करत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यापारीनी मोर्चाकडे तात्काळ चिनी बेदाण्यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. बाईट - युवराज पाटील - सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव.
0
Report
SMSarfaraj Musa
Aug 06, 2025 09:03:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - भारतीय बेदाण्यावर ड्रॅगनचा डोळा ! महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय कोट्यावधीचा फटका.. अँकर - चिनी बेदाण्याने सध्या भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे.कमी दरात मिळणारा चिनी बेदाणा भारताची बाजार पेठे काबीज करत आहे.त्यामुळे भारतातील विशेषता महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे..पाहूया ड्रॅगनच्या बेदाण्याचा स्पेशल रिपोर्ट.. व्ही वो- भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचा गेल्या काही वर्षात बोलबाला आहे.आता यामध्ये भर म्हणून की काय शेतकऱ्यांच्या बेदाण्याला चिनी बेदाण्याने लक्ष केले आहे. नेपाळ,भूटान,बांगलादेश मार्गे भारतात येणाऱ्या बेदाणा हा भारतातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. चोरट्या मार्गे आणि कर चुकून येणाऱ्या बेदाण्यामुळे भारतीय बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे,अडीचशे ते तीनशे रुपये किलो दराने चिनी बेदाण्याची विक्री सुरू आहे.त्यामुळे भारतीय बेदाण्याच्या दरात 70 ते 100 रुपयापर्यंत घट झाली. बाईट - युवराज पाटील - सभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती,तासगाव. एक नजर टाकूया महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादनावर.. ग्राफीक्स इन 2024,25 या वर्षामध्ये महाराष्ट्रात दोन लाख 46 हजार 65 टन इतक्या बेदाण्याचे उत्पादन झालं 2025 26 सालामध्ये एक लाख 54 हजार 870 टन इतकं बेदाण्याचे उत्पन्न झालं गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात 91,730 टणांची घट झाली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्या अखेर 1 लाख बेदाणा शिल्लक होता. यंदाच्या वर्षी उत्पादन कमी असल्याने 52 हजार टन बेदाणा शिल्लक आहे. ग्राफिक out व्ही वो - देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक बेदाण्याचे उत्पादन घेतलं जातं यामध्ये सांगली नाशिक सोलापूर अशा जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यंदाच्या हंगामात बेदाण्याचे उत्पादन घटल्याने बेदाण्याचे दर हे वाढले होते पाचशे ते सहाशे रुपये किलो इतका सरासरी दर मिळू लागल्याने शेतकरयांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बाईट - धागेराव थोरात - द्राक्ष उत्पादक शेतकरी -वाळवा, सांगली. व्ही वो - चिनी बेदाणा आणि भारतात विशेषतः महाराष्ट्रात तयार होणाऱ्या बेदाणा मध्ये फारसा दिसण्यात फरक नाही बेदाण्याचा रंग हा हिरवा आहे,त्यामुळे तो दिसायला चांगला आहे,मात्र त्याची गुणवत्ता ही भारतीय बेदाण्यापेक्षा कमी आहे, शिवाय अडीचशे आणि तीनशे रुपये दर असल्याने ग्राहकांकडून या बेदाण्याला पसंती दिली जातेय. बाईट - राजेंद्र कुंभार - अध्यक्ष - बेदाणा व्यापारी असोसिएशन,सांगली. व्ही वो - यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळत होता, मात्र गेल्या एक महिन्यापासून चिनी बेदाणा चोरट्या मार्गाने भारतात येऊ लागलाय आणि परिणाम हा बेदाण्याचे भारतातले दर गडगडले, त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा फटका महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. व्ही वो - विनायक हिंगमीरे - बेदाणा व्यापारी - सांगली. व्ही वो - चायना मधून होणारी बेदाण्याची अवैध तस्करी थांबवावी भारतीय बाजारपेठेत असणाऱ्या बेदाण्याच्या विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी आता द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष संघटना आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे त्यासाठी मोर्चे देखील काढण्यात आलाय. बाईट - अशोक बाफना - बेदाणा व्यापारी - तासगाव. व्ही वो - अजित भारतीय बाजारपेठेवर ड्रॅगन चा वेळ का गेल्या काही वर्षात वाढत असताना आता शेतकऱ्यांच्या मालावर देखील ड्रॅगनची फुत्कार सुरू झाली असून स्वदेशीचा नारा देणाऱ्या केंद्र सरकारने चिनी बेदाण्या बाबतीत कठोर भूमिका घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि शेतीला प्रचंड फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे..
0
Report
SMSarfaraj Musa
Aug 06, 2025 08:46:30

AAASHISH AMBADE
Aug 06, 2025 08:46:26
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0608ZT_CHP_RAIN_AFTER_GAP ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहर जिल्ह्यात पावसाची हजेरी, तब्बल दहा दिवसानंतर बरसला पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, अर्धा तासापासून कोसळत आहे पाऊस      अँकर:--चंद्रपूर शहर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. तब्बल दहा दिवसानंतर पाऊस बरसला. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी अनुभवायला मिळाली. सुमारे अर्धा तासापासून हा पाऊस कोसळत आहे. प्रचंड उकाड्याने त्रस्त नागरिकांना यामुळे दिलासा मिळालाय. धान- कापूस व सोयाबीन पिके शेतात सुकत चालली असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 52 टक्के एवढा पाऊस पडलाय. सिंचन प्रकल्पही कोरडे असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
Report
AKAMAR KANE
Aug 06, 2025 08:19:57
kolhapur, Maharashtra:
व्हिडिओ आणि बाईट असाइन्मेंट ला व्हाट्सअप केले आहे ----- नागपूर --- पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता --- ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही एकच कविता दोन्ही वर्गात असल्याने पालकांना संभ्रम --- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ ? --- पहिल्या वर्गात पान क्रमांक 28तर दुसरीच्या पान नंबर 16 वर तिच कवीता --यंदा प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना सीबीएससीच्या धर्तीवर पहिलीचे पुस्तके देण्यात आली... त्यामुळे पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकात बर्ड्स कॅन फ्लाय ही कविता जशीच्या तशी आली.. जी अगोदरच दुसरीच्या पुस्तकात होती --- केवळ चित्र बदलण्यात आले, पण दोन्ही वर्गात एकंच कविता.... --- त्यामुळे कॉपी पेस्ट करण्याचं प्रकार आहे की चूक आहे की यामागे बालभारतीची काही भूमिका आहे कळायला मार्ग नाही.... --मात्र त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होताय
0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 06, 2025 08:04:46
Ambegaon, Maharashtra:
Feed 2C Slug: Ambegaon 19 Missing File:01 Rep: Hemant Chapude(Ambegaon) *आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दमधील ९० बॅचमधील १९ जण उत्तराखंडमध्ये बेपत्ता?* Anc :- आंबेगाव तालुक्य्तील अवसरी खुर्द येथील १९९० सालच्या १० वी च्या बॅचमधील ८ पुरुष आणि ११ महिलांचा एक समूह पर्यटनासाठी १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. Vo :- काल सकाळी या समूहातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात काही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व समूह त्या भागातच असल्याचे सांगितले जात आहे.काल या समूहातील एका महिलेने तिच्या मुलाला कॉल करून "आम्ही सर्वजण सुखरूप आहोत," असे सांगितले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.स्थानिक प्रशासन, उत्तराखंड पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा या प्रकरणाचा तपास घेत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 06, 2025 07:47:49
Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग: भरधाव कारची पादचाऱ्याला धडक..... पादचाऱ्याचा जागीच मृत्यू. पादचाऱ्याला धडक देऊन वाहन चालकाचे पलायन. कार चालक अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जयंत यांचा मुलगा असल्याची पोलिसांची माहिती. आरोपी अभिजीत खताते याच्यावर चिपळूण पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल...मात्र अद्याप अटक नाही.
0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 06, 2025 07:47:12
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पोलीस कर्मचाऱ्यांने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या गोळीबारात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उमेश सूर्यवंशी असे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कृषी बाजार समितीच्या परिसरात निवडणूक यंत्रांच्या निग्राणीसाठी सूर्यवंशी हे नियुक्त होते. कर्तव्ययावर असतांना त्यांनी स्वतःवाई गोळीबार करून घेतला. उमेश सूर्यवंशी यांनी स्वतःवर गोळीबार का केला हे अध्याय स्पष्ट झालेलं नाही पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत. आझाद नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, यां गोळीबाराच्या घाय्यानेमुळे संपूर्ण पोलीस दल हादरून गेले आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
KJKunal Jamdade
Aug 06, 2025 07:46:43
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैजापूर तालुक्यातील शनीदेवगावकडे रवाना... शिर्डीच्या विमानतळावरून हेलीकॉप्टरने रवाना.. राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजनही सोबत.. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनी देवगाव येथे गंगागीरी महाराज सप्ताहाची होणार सांगता..
0
Report
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 07:46:34
Nashik, Maharashtra:
नाशिक * नाशिकची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी घेतली जाणार मुंबई पोलिसांची मदत * मुंबई पोलिस देणार ट्रॅफिक बाबत नाशिक पोलिसांना ट्रेनिंग.. * मंत्री छगन भुजबळ लिहिणार मुंबई पोलिसांना पत्र.. * नाशिकमध्ये येऊन नाशिक पोलिसांना ट्रेनिंग देण्याची करणार मागणी.. * शहरात वाहतुकीचा फज्जा.. * अनेक भागात दररोज होतेय तासंतास वाहतूक कोंडी.. * नाशिकची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घेतली जाणार आता मुंबई पोलिसांची मदत
0
Report
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 07:34:13
Nashik, Maharashtra:
nsk_stationmaramari व्हिडिओ 1 images 2 Anc: नाशिकच्या अभोण्यातील संताजी चौक परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये रस्त्यावर व पोलीस ठाण्यात थेट हाणामारी झाली. या प्रकरणात वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांसमोरच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अभोणा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत फिर्यादी स्वप्नील उर्फ गणेश मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल दुसाने, हर्षल जाधव, महेश जाधव, गोपाल शेखावत, जयपाल शेखावत, विशाल शिरोरे व नयन आहेर (सर्व रा. अभोणा) यांनी मुसळे यांच्या गाडीला अडवून शिवीगाळ करत हातातील काठ्यांनी व फायटरने मारहाण केली. तसेच त्यांची स्विफ्ट गाडी (क्र. MH15 DM 1017) दगड व काठ्यांनी फोडून नुकसान केल्याचे नमूद आहे. यावेळी जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूने अमोल दुसाने याने दिलेल्या तक्रारीनुसार, स्वप्नील उर्फ गणेश मुसळे यांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ करत मुलांना गाडीने उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील तीन-चार तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमोल दुसाने व हर्षल जाधव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता, त्यांच्या मागोमाग स्वप्नील मुसळे व त्यांची पत्नी तेजस्विनी मुसळे तिथे दाखल झाले. यावेळी पोलीस ठाण्यातच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले आणि शिवीगाळ व मारहाण सुरू झाली. हा सर्व प्रकार पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, गांगुर्डे व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडला असून, सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. या प्रकारामुळे "पोलिसांपुढेच जर असा बेधडक मारहाणीचा प्रकार घडतो, तर नागरिकांमध्ये कायदा व पोलिसांचा धाक उरला आहे का?" असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अभोणा पोलीस ठाण्याने यानंतर अधिक कडक भूमिका घेतली असून, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
0
Report
AAASHISH AMBADE
Aug 06, 2025 07:31:30
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0608ZT_CHP_NO_RAIN ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात पाऊस झाला बेपत्ता, सुमारे 12 दिवसापासून पाऊस नसल्याने धान पिके वाळत चालल्याची स्थिती अँकर:--चंद्रपुरात पाऊस बेपत्ता झालाय. सुमारे 12 दिवसापासून पाऊस नसल्याने धान पिके वाळत चालली आहेत.  जुलै च्या पहिल्या पंधरवड्यात उत्तम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. त्यामुळे धान- सोयाबीन आणि कापूस पिके वाढीस लागली होती. मात्र पावसाने ओढ दिल्याने पिके करपण्याची वेळ आली आहे. लवकर पाऊस न झाल्यास शेतीचा हंगाम वाया जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे उधार आणि कर्ज यांचा विळखा बसलेल्या शेतकऱ्यांपुढील संकट वाढले आहे. बाईट १) शेतकरी, लोहारा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 07:30:10
Nashik, Maharashtra:
Nsk_Farande feed by live u 51 ANchor- आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक शहरातील पी अन टि कॉलनीतील खड्ड्यांचे पाहणी केलीय. परिसरातील नागरिकांनी सुद्धा यावेळी आ. फरांदे यांच्याकडे समस्यांचे पाढे वाचले. पावसाळ्यांत परिसरात खड्डे पडत असून धूळ होत आहे. यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाण वाढले असल्याच नागरिकांनी सांगितलय. खड्डे बुजविण्याच्या कामाची चौकशी करावी तसेच खड्डे बुजविण्याससाठी वापरण्यात येणाऱ्या गिट्टीची सुद्धा तपासणी महानगर पालिकेने करावी अशी मागणी यावेळी आ. फरांदे यांनी केलीय. Byte आ. देवयानी फरांदे - शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं आणि धुळीचं साम्राज्य पसरलंय - खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी केली जाते - ठेकेदाराकडून गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करून घेतले पाहिजेत - खड्डे भरतांना क्वालिटी कंट्रोल तपासणं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम आहे - दरवर्षी रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र तरीदेखील रस्ते खड्ड्यात जातात - चांगले रस्ते तयार करून घेण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे - खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे, रस्त्यांवरील धूळ देखील स्वच्छ केली पाहिजे
0
Report
Advertisement
Back to top