Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पुत्रता एकादशी: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची भव्य सजावट!

SKSACHIN KASABE
Aug 05, 2025 05:17:08
Pandharpur, Maharashtra
05082025 Slug - PPR_EKADASHI_SAJAVAT file 01 ----- Anchor - आज श्रावण महिन्यातील पुत्रता एकादशी आहे त्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सुंदर आणि आकर्षक सजावट केली आहे. विठुरायाचा गाभारा चौखांबी सोळखांबी मधील परिसरात ही सुंदर सजावट केली आहे.यामध्ये गुलाबांच्या विविध रंगाच्या फुलांचा वापर केलेला आहे. पानाफुलांची रंगसंगती वापरून ही सजावट केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनास आलेले भाविक आवर्जून मंदिराचे पुरातन रूप आणि ही सजावट पाहतात
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Aug 06, 2025 04:48:39
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0608ZT_WSM_ZP_RESERVATION रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे,अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत होती. मात्र,न्यायालयाने या संदर्भात निर्णय देताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणानुसारच घेण्यात याव्यात,असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.या निर्णयानुसार वाशिम जिल्हा परिषदेतील एकूण ५२ जागांपैकी ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गासाठी पूर्वीप्रमाणेच १४ जागा आरक्षित राहतील.त्याचप्रमाणे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी ११ जागा, अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी ४ जागा तर खुल्या प्रवर्गासाठी २३ जागा राखीव असतील.यामध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण कायम राहणार आहे, त्यामुळे सर्व प्रवर्गांमध्ये महिलांचे समावेश सुनिश्चित करण्यात आला आहे.
0
Report
SMSATISH MOHITE
Aug 06, 2025 04:47:08
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_MLA Feed on - 2C ------------------------------ Anchor - मी प्रत्येक वेळी वेगळ्या पक्षातून निवडून आलो त्यामुळे तुमची पहिली वेळ असल्याचे सांगून मला मंत्रिपद मिळाले नाही. पण माझी सिनियरिटी काउंट करण्याचा आणि न्याय देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. तुमच्या मनातील ज्या भावना आहेत त्या परमेश्वर लवकर पूर्ण करेल असे म्हटले तर चुकीचे होणार नाही असेही चिखलीकर म्हणाले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. चिखलीकर यांच्या या वक्तव्याने मंत्रिपद मिळवण्याची त्यांची इच्छा पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आली. Sound Byte - आ. प्रताप पाटील चिखलीकर --------------------------
0
Report
PNPratap Naik1
Aug 06, 2025 04:33:04
Kolhapur, Maharashtra:
Kop Maratha Samrajya Waad आत्ताची सर्वात मोठी बातमी. Anc :- जसलमेरच्या राज परिवाराने NCERT च्या इयत्ता 8वी पुस्तकात असणाऱ्या मराठा साम्राज्याच्या नकाशाला विरोध केला आहे. आठवीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा चुकीचा असल्याचा सांगून तो काढून टाकावा अशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी केलीय. चैतन्यराज सिंग यांनी X वर ट्विट करत ही मागणी केली आहे.. NCRT ने प्रकाशित केलेल्या 8 वीच्या सामान्य ज्ञान पुस्तकाच्या युनिट 3 मधील पान नंबर 71 मध्ये दाखविलेल्या नकाशामध्ये जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे. तो ऐतिहासिक दृष्टीने पूर्णतः चुकीचा असल्याचे म्हटलय. पूर्णतः अनऐतिहासिक तथ्यांवर आधारित असणार हे पुस्तक म्हणजे NCERT च्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. अशा प्रकारचा इतिहास म्हणजे आमच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणारी आहे.. इतकच नाही तर आमच्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाचा अपमान आहे असं देखील चैतन्यराज सिंग यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.. जैसलमेरच्या कोणत्याही ऐतिहासिक साधनांमध्ये मराठा समाजाचे आधीपत्य, आक्रमणाचा कोणताही उल्लेख नसल्याचे म्हटले आहे...चैतन्यराज सिंग यांनी अशा प्रकारचे ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 06, 2025 04:32:31
Hingoli, Maharashtra:
अँकर- हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर रेल्वेचे तीन डबे रेल्वे ट्रक सोडून उभे केले आहेत, या डब्यातील मधल्या डब्याला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आलीय, ही आग नेमकी कशी लागली की कुणी लावली हे अद्याप कळू शकले नाही, आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले असून अग्निशामक दलाच्या वतीने आग विझविण्याचे काम सुरू आहे, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही... सदर रेल्वे ही मुख्य ट्रॅकवर नसल्याने वाहतुकीला ही कुठलाच अडथळा झाला नाहीये...
0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 06, 2025 04:32:23
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_R2_FIR ठाकरे गटाच्या युवासेनेच्या महिला नेत्या मनीषा वाघमारे यांची ७ लाखांची फसवणूक शासकीय टेंडर मिळवून देतो अशी बतावणी पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी आरोपी प्रयास उर्फ शंभुराजे भोसले याच्यावर आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल Anchor धाराशिवमध्ये शासकीय टेंडर मिळवून देतो, असे सांगून ठाकरे गटाच्या युवासेनेच्या राज्य सचिव मनीषा वाघमारे यांची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. पैसे परत मागितल्यावर शासकीय कामात अडथळा आणतो आणि जीवे मारतो, अशी धमकी आरोपीने दिली. या प्रकरणी साताऱ्यातील प्रयास उर्फ शंभुराजे दत्तात्रय भोसले (रा. होळ, ता. खटाव) याच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात फसवणूक व धमकीचे गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा वाघमारे यांनी ४ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन महिन्यांत ७ लाखांच्या बदल्यात १० लाख देतो असे आमिष दाखवले होते. परंतु मुदत उलटल्यानंतर पैसे परत न देता, महिलेला धमकी दिली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
Report
GMGANESH MOHALE
Aug 06, 2025 04:20:30
Washim, Maharashtra:
वाशीम: File:0608ZT_WSM_SORGHUM_PRICE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर : वाशिमच्या बाजारात ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली असून परिणामी आवकही घटलीये सध्या ज्वारीला अवघा १ हजार ५१० ते १ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळतोय. हा दर सरकारने जाहीर केलेल्या ३ हजार ३७१ रुपयांपेक्षा तब्ब्ल १६०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळं सरकारनं नाफेड मार्फत ज्वारीची हमीभावानं खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय.
0
Report
MNMAYUR NIKAM
Aug 06, 2025 04:20:22
Buldhana, Maharashtra:
खामगाव येथील व्यापाऱ्याचा विहिरीत हातपाय बांधलेला मृतदेह आढळला.* *मलकापूर तालुक्यातील धानोरा येथिल घटना.* *दोन दिवसांपूर्वी हरविल्याची तक्रार होती दाखल ,परिसरात उडाली खळबळ ..* *घातपाताची शक्यता असल्याने पोलिस तपास सुरू.* Anchor - मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील एका विहिरीत हातपाय बाधलेला 48 वर्षीय व्यक्ती चा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली .. याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून घटनेचा तपासा सुरू केला आहे .. विहिरीतील मृतदेह हा खामगाव येथील व्यापारी असलेले घनश्याम भुतडा यांचा असल्याचे समोर आल असून मृतदेह हातपाय बांधलेला अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसाना घातपाताची शंका बळावली असून त्यादृष्टीने तपास सुरू केलाय.. तर मृतकाचे नातेवाईकांनी सुद्धा घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केलीय. बाईट - मृतकाचा मुलगा.
0
Report
MNMAYUR NIKAM
Aug 06, 2025 04:18:40
Buldhana, Maharashtra:
दुर्दैवी 'हुमणी'चा विळखा... शेतकऱ्याने फिरवला 15 एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर Anchor - बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करत, मोठ्या आशेने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावर हुमणी अळीने थैमान घातलं आहे. हिरवीगार शेतं डोळ्यासमोर करपून जात असताना, हतबल झालेला शेतकरी आपल्याच पिकावर ट्रॅक्टर फिरवताना दिसतोय. हे दृश्य मन हेलावून टाकणारं आहे. खामगाव तालुक्यातील वडजी भेंडी गावातील शेतकरी विजय मुंढे यांच्या वेदनाही अशाच आहेत. 15 एकर शेतात त्यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीनची लागवड केली होती. पण हुमणी अळीच्या प्रकोपामुळे उभं पीक मातीमोल झालं. ही परिस्थिती पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. काळजावर दगड ठेवून त्यांना आपल्याच 15 एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला. आजोबा-पणजोबांपासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही, तर ती त्यांची ओळख आणि जीवन आहे. आपलं पीक असं नष्ट झालेलं पाहणं, हे त्यांच्यासाठी एखाद्या अपत्याला गमावण्यासारखं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मुंडे यांच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 06, 2025 04:15:54
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_CONGRES धाराशिव मध्ये काँग्रेसला धक्का. दोनशे पदाधिकाऱ्यांनी केला मुंबईत भाजपामध्ये प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवराज पाटील धाराशिव च्या राजकारणात सक्रिय. अँकर धाराशिव_ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,सरपंच डीसीसी बँकेचे संचालक अशा जवळपास 200 काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी काल मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे. नुकतेच काँग्रेस मधून भाजपा मध्ये गेलेले माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवराज पाटील पुन्हा एकदा धाराशिवच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. बसवराज पाटील हे सध्या लातूर ग्रामीणचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत.
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 06, 2025 04:02:48
Latur, Maharashtra:
लातूर स्किप्ट ::- लातूर बाजार समितीत सोयाबीनच्या दरात वाढ... आज सोयाबीनला मिळाला ४७०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव.. आवक कमी झाल्याचा परिणाम... AC  ::- लातूरच्या बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.. बाजार समितीत आज सोयाबीनला जवळपास ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला... बाजारात सध्या सोयाबीनची आवक कमी होत असल्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिलीय... सध्या बाजारात पाच ते सहा हजार क्विंटल इतकी आवक होत आहे.. दरम्यान, सोयाबीन विक्रीच्या हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीनची बाजारात विक्री केली...त्यावेळी त्यांना चार हजारांच्या आत भाव मिळाला... आता बहुतांश शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे सध्या दिसून येत आहे... त्यामुळे या भाववाढीचा लाभ भावाच्या प्रतिक्षेत आतापर्यंत सोयाबीन विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलीय...
0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 06, 2025 04:02:41
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn fire feed attached पैठणमध्ये महा ई सेवा केंद्राला आग पैठण शहरातील भाजी मंडई परिसरातील महा ई सेवा केंद्राला आग.. पैठण शहरातील भाजी मंडई परिसरात असणाऱ्या एका महा इ सेवा केंद्राला रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडलीय विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग असल्याचे सांगितले जाते, या आगीत महा ई सेवा केंद्रातील महत्त्वाचे कागदपत्रासह कॅम्पुटर, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, लॅमिनेशन मशीन, फर्निचर आदी आधी वस्तू जळून खाक झाल्यात आहेत या आगीत महा इ सेवा चालकाचे चार-पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहिती आहे.
0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 06, 2025 04:02:34
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_MALEGAON एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 मालेगाव बॉम्बस्फोटातील 7 आरोपींच्या निर्दोष सुटकेवर सरकारकडून कोणतीही अपील प्रस्तावित नाही; कायदा व न्याय विभागाचा खुलासा, RTI अधिकारातून माहिती उघड अँकर :- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले सात आरोपींविरुद्ध उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही अशी माहिती शासनाच्या कायदा व न्याय विभागाने आरटीआय अंतर्गत दिली आहे. अमरावतीचे रहिवासी अजय बसुदेव बोस यांनी दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी माहितीच्या अधिकाराखाली संबंधित माहिती मागवली होती. त्यांच्या अर्जाला उत्तर देताना विभागाचे सार्वजनिक माहिती अधिकारी तथा कायदेशीर अधीक्षक लक्ष्मण आर. कनाडे यांनी स्पष्ट केले की 2006 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात 6 जणांचा मृत्यू झाला होता व 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. मात्र या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या सात आरोपींविरुद्ध उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबत या शाखेकडे कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. तसेच या निर्णयाविरोधात अपिल करायचे असल्यास अर्जदाराने 30 दिवसांच्या आत विभागाच्या पहिल्या अपीलीय प्राधिकाऱ्यांकडे (राजनिकांत एम. जाधव – सहाय्यक कायदे सल्लागार) अपील करावे असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
0
Report
SMSATISH MOHITE
Aug 06, 2025 04:00:40
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Dam Feed on - 2C --------------------------- Anchor - नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणग्रस्तानी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या 40 वर्षांपासून रखडलेल्या या धरणाच्या गळ भरणीला सुरुवात झाली आहे. पण बाधित शेतकऱयांना विश्वासात न घेता गळभरणी ला सुरुवात केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र आणि तेलंगनाला या धरणाचा फायदा होणार आहे. पण कमी मावेजा दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूनर्वसनातील कामे आणि इतर मागण्या पूर्ण झाल्यानंतर गळभरणी करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तंची आहे. ------------
0
Report
KPKAILAS PURI
Aug 06, 2025 03:49:59
Pune, Maharashtra:
आता हिंजवडीतील रस्त्यांवर धावणार डबल डेकर बस....! लवकरच pmpml व्या ताफ्यात दाखल होणार इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस...! pimpri d decker kailas puri Pune 6-8-25 feed by 2c ANCHOR - आयटी नगरी हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता , PMPML ने ही हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच पुण्यातील आय टी कंपन्या असलेल्या भागात डबल-डेकर बस सेवा सुरू होणार आहे. ही डबल डेकर बस आधुनिक इलेक्ट्रिक स्वरूपात असणार आहेत. सुरुवातीला ही सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख IT पार्क क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे, ज्यात हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी या भागांचा समावेश असणार आहे. लवकरच या डबल डेकर बस पीएमपीएलच्या ताब्यात आणल्या जाणार असल्याचं पीएमपीएल कडून करण्यात आलं आहे. त्याच संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी....! kailas puri wkt+vis
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 06, 2025 03:49:49
Mira Bhayandar, Maharashtra:
Date-6aug2025 Rep-prathamesh tawade Loc-bhayander Slug-BHAYANDER CRIME Feed send by 2c Type-Avb Slug- दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला अटक खंडणी विरोधी पथकाची कारवाई २ देशी पिस्तूल, ८ जिवंत काडतूसाहे , २ कार जप्त अँकर - भाईंदरच्या पेनकर पाडा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुलं, आठ जिवंत काडतुसे आणि दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. मीरा रोड येथील सनशाइन हॉटेलजवळ ही टोळी दरोड्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेले आरोपी यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभागी असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. बाईट- प्रमोद राख , पोलिस निरीक्षक.
0
Report
Advertisement
Back to top